• Download App
    सरकारी खर्चाने आम आदमी पार्टीच्या जाहिराती; 163 कोटी वसूल करण्याचे आदेश; केजरीवालांना दणका Aam Aadmi Party advertisements at government expense; 163 crore ordered to be recovered; A blow to Kejriwal

    सरकारी खर्चाने आम आदमी पार्टीच्या जाहिराती; 163 कोटी वसूल करण्याचे आदेश; केजरीवालांना दणका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सरकारी योजनांच्या जाहिरातींच्या नावाखाली आम आदमी पार्टीने दिल्लीत पक्षाच्या जाहिराती छापल्या. त्याचे तब्बल 163.62 कोटी रुपये वसूल करण्याची नोटीस दिल्ली सरकारने आम आदमी पार्टीला पाठवली आहे. हे 163.62 कोटी रुपये जमा करण्यासाठी 10 दिवसांची मुदत सरकारने आम आदमी पार्टीला दिली आहे. या मुदतीत आम आदमी पार्टीने ही रक्कम भरली नाही, तर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. Aam Aadmi Party advertisements at government expense; 163 crore ordered to be recovered; A blow to Kejriwal



    दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचेच सरकार आहे. त्या सरकारने विविध सरकारी योजनांच्या नावाखाली स्वतःच्या पक्षाच्या जाहिराती सरकारी खर्चाने छापल्या. त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले आणि 97 कोटी रुपयांचे बिल वसूल करण्याचे आदेश दिले.

    त्यानुसार दिल्ली सरकारच्या प्रसिद्धी विभागाने या सर्व जाहिरातींचा हिशेब काढला आणि तो तब्बल 163.62 कोटी रुपये भरला आहे. त्यामुळे प्रसिद्धी विभागाने आम आदमी पार्टीला त्या रकमेची रिकव्हरी करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

    Aam Aadmi Party advertisements at government expense; 163 crore ordered to be recovered; A blow to Kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड