वृत्तसंस्था
बंगळुरू : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची सून भवानी रेवन्ना यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत देवगौडा यांची सून एका व्यक्तीला बसखाली जाऊन जीव दे, असं म्हणत आहेत.A two-wheeler hit a car, the daughter-in-law of the former prime minister angrily said – if you want to die, go under the bus, my car is worth one and a half crores
बसखाली जाऊन जीव दे -भवानी रेवन्ना
भवानी रेवन्ना या उडुप्पी येथील साळीग्रामला जात होत्या. त्यावेळी प्रवास करत असताना त्यांच्या कारला एका दुचाकीने धडक दिली. कारला धडक बसल्याने भवानी रेवन्ना संतप्त झाल्या आणि त्या गाडीतून खाली उतरल्या. त्यानंतर त्यांनी दुचाकीस्वाराला शिवीगाळदेखील केली.
भवानी दुचाकीस्वाराला म्हणाल्या, तुम्हाला मरायचे असेल तर माझ्या गाडीखाली कशाला मरता? माझी गाडी ही दीड कोटी रुपयांची आहे. आता तुम्ही माझ्या गाडीची नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये द्याल का? त्यामुळे तुम्ही एखाद्या बसखाली जाऊन जीव द्या. असे भवानी रवाना म्हणाल्या.
देवेगौडा यांचा काँग्रेससह नितीश यांच्यावर निशाणा, JDSला JDU मध्ये विलीनी करण्याची होती ऑफर
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले लोक भवानी रेवन्ना यांना उद्धट म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर दुसरीकडे काही लोक दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने गाडी चालवत असल्याने त्यावरही प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.
A two-wheeler hit a car, the daughter-in-law of the former prime minister angrily said – if you want to die, go under the bus, my car is worth one and a half crores
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…