• Download App
    २० जुलैपासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, जुन्या इमारतीत सुरूवात तर नव्या इमारतीत समारोप A total of 17 meetings will be held in the 23 day session

    Monsoon session : २० जुलैपासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, जुन्या इमारतीत सुरूवात तर नव्या इमारतीत समारोप

    २३ दिवसांच्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. Monsoon session A total of 17 meetings will be held in the 23 day session

    प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले की, “संसदेचे पावसाळी अधिवेशन, 20 जुलैपासून सुरू होईल आणि ११ ऑगस्टपर्यंत चालेल. या २३ दिवसांच्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होणार आहेत.” ते म्हणाले, “मी सर्व पक्षांना आवाहन करतो की अधिवेशन काळात विधीमंडळ आणि संसदेच्या इतर कामात विधायक योगदान द्यावे.”

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा पुरस्कार केल्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होणार असून नंतर नव्या संसद भवनात बैठका होऊ शकतात.

    Monsoon session A total of 17 meetings will be held in the 23 day session

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी