दुकानाला आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरात असणाऱ्या एका कापड दुकानास लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 पुरुष, 2 मुले आणि 3 महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.A terrible fire broke out at a textile shop in Chhatrapati Sambhaji Nagar Seven people died, including two children and three women
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजता कपड्याच्या दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली मात्र तरीही या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला.
संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, आलम दर्जी यांच्या दुकानाला आग लागली आणि त्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर लोक राहत होते. मात्र, आग वरपर्यंत पोहोचली नव्हती त्यामुळे त्यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचा अंदाज आहे.
दुकानाला आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतरच सर्व मृतांच्या मृत्यूचे खरे कारण समजणार आहे.
A terrible fire broke out at a textile shop in Chhatrapati Sambhaji Nagar Seven people died, including two children and three women
महत्वाच्या बातम्या
- नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग निवृत्त; एका दैदिप्यमान युगाचा अंत!!
- साताऱ्याच्या तिढ्यात, पृथ्वीराज चव्हाण अडकायला तयार नाहीत पवारांच्या जाळ्यात!!
- आतापर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 97.69 टक्के नोटा बँकांमध्ये आल्या परत
- सावरकरांच्या काळ्या पाण्यावर गलिच्छ बोलणाऱ्यांना केजरीवालांच्या तुरुंगवासाचे “कौतूक”!!