• Download App
    Pandharpur पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात

    Pandharpur : पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात

    Pandharpur

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : Pandharpur पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खाजगी बसचा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Pandharpur

    हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील आहेत. आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावा नजीक हा अपघात झाला.



    राजनंदनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांची मोठे नुकसान झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 32 जण गंभीर जखमी झाले आहेत.

    A terrible accident happened to a private bus of devotees near Pandharpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gujrat Election : पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ, गुजरात प्रदेशाध्यक्षांनीच दिला राजीनामा

    Iran attacks : इराणने कतार, इराक अन् बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर केला हल्ला!

    Rohit Sharma : रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ वर्षे पूर्ण; भावनिक पोस्ट शेअर केली