• Download App
    बंगालमधील अभूतपूर्व हिंसाचाराबाबत बंगाली शिक्षणतज्ञ, बुध्दिवादी समूदायाचा केंद्राकडे अहवाल; केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती A team of Group of Intellectuals and Academicians has submitted the Centre its report into violent incidents that took place after Bengal assembly polls.

    बंगालमधील अभूतपूर्व हिंसाचाराबाबत बंगाली शिक्षणतज्ञ, बुध्दिवादी समूदायाचा केंद्राकडे अहवाल; केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीनंतर अभूतपूर्व हिंसाचार झाला. तो अजूनही सुरू आहे. या हिंसाचाराबाबत बंगाली शिक्षणतज्ञ आणि बुद्धिवादी समूदायाने तयार केलेला एक अहवाल केंद्र सरकारला त्यांनी सादर केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज पत्रकारांना दिली. A team of Group of Intellectuals and Academicians has submitted the Centre its report into violent incidents that took place after Bengal assembly polls.

    बंगालमध्ये पोलीसच तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसारखे वागत असल्याचा गंभीर आरोप रेड्डी यांनी केला. ते म्हणाले, तृणमूळ काँग्रेसची राज्य चालविण्याची पध्दतच मूळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या विरोधात आहे. तृणमूळ काँग्रेस संघराज्य पध्दती मानताना दिसत नाही. राज्यातील जनतेच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात पोलीस अपय़शी ठरले आहेत.

    राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. या हिंसाचाराबाबतचा एक अहवाल बंगाली शिक्षणतज्ञ आणि बुद्धिवादी समूदायाने तयार केला आहे आणि तो त्यांनी केंद्र सरकारला सादर केला आहे. केंद्र सरकारने टीम पाठविली होती. त्या टीमचाही तशाच स्वरूपाचा अहवाल केंद्र सरकारला मिळाला आहे. केंद्र त्यावर येत्या काही दिवसांत चर्चा करून निर्णय घेईल.

    A team of Group of Intellectuals and Academicians has submitted the Centre its report into violent incidents that took place after Bengal assembly polls.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार