वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आग्नेय आशियातील देशांची समुद्री सुरक्षा तसेच दक्षिण चीन समुद्रातील (south china sea) चीनचे आव्हान मोडून काढण्यासाठी भारतीय नौदलाने सामरिक दृष्ट्या मोठे पाऊल उचलले आहे. A task force of Indian Navy’s Eastern Fleet is scheduled to proceed on an Overseas Deployment to South East Asia, the South China Sea & Western Pacific from early Aug 2021 for over two months
भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा विशेष टास्क फोर्स पुढील दोन महिने दक्षिण चीन समुद्र तसेच पॅसिफिक महासागरात तैनातीला असणार आहे. या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट २०२१ च्या सुरुवातीलाच हा टास्क फोर्स दक्षिण चीन समुद्र आणि पॅसिफिक महासागराच्या दिशेने कूच करणार आहे.
आग्नेय आशियातील ११ देश, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्याशी चीनचा सीमावाद आहे. दक्षिण चीन समुद्र तसेच पॅसिफिक महासागरात चीन आपल्या नौदलाचे वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. त्याला काटशह देण्याची ताकद आग्नेय आशियातील छोट्या देशांमध्ये नाही. परंतु भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या देशांकडे ती ताकद आहे.
आग्नेय आशियातील देशांची भारताचे मैत्री आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत ते टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आणि भारताच्या सामरिक आणि सागरी सीमा सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय नौदलाने आपल्या ईस्टर फ्लीटमधील टास्क फोर्स दक्षिण चीन समुद्र आणि पॅसिफिक महासागरात पुढील दोन महिन्यांसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सामरिक दृष्ट्या भारताचे हे आक्रमक पाऊल मानले जात आहे.