दोन शूटर्सना अटक; या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील वाढत्या गुन्हेगारींच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पाटणामधील दानापूर कोर्टात हजर होण्यासाठी जाणाऱ्या कैद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.A prisoner was shot dead inside the court premises in Bihars Danpur
छोटे सरकार असे मृत कैद्याचे नाव आहे. त्याला बेऊर तुरुंगातून आणण्यात आले होते. बिहटा पोलीस ठाण्यातील सिकंदरपूर येथील रहिवासी राजन सिंह यांचा मुलगा अभिषेक उर्फ छोटे सरकार अनेक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी होता. पोलिसांनी घटनास्थळी दोन शूटर्सना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरपूर, बिहटा येथील रहिवासी राजन सिंह यांचा मुलगा छोटे सरकार उर्फ अभिषेक कुमार हा तीन भावांमध्ये सर्वात लहान होता. बिहाटा पोलीस ठाण्यात मारहाण आणि लूटमारीचे अनेक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात नौबतपूर मसोधी आणि जेहानाबाद पोलिस ठाण्यातही खुनाच्या गुन्ह्याची नोंद होती. माजी आमदाराच्या नातेवाईकांच्या हत्येप्रकरणी छोटे सरकार आणि त्याचा मोठा भाऊ राहुल कुमार तुरुंगात होते.
ज्याप्रमाणे छोटे सरकारची न्यायालयात हजेरीला जात असताना हत्या करण्यात आली, त्याचप्रमाणे अमित कुमार प्रकरणात दोषी ठरलेला बिहता सिनेमा हॉलचा मालक निर्भय सिंग याची झारखंडमधील देवघर न्यायालयाच्या आवारात हत्या करण्यात आली होती.
A prisoner was shot dead inside the court premises in Bihars Danpur
महत्वाच्या बातम्या
- 6 मोबाइल फोन, URL आणि बँक अकाउंटवरून उलगडणार संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचे रहस्य
- Stock Market : शेअर बाजारात झंझावाती तेजी, निफ्टी नव्या विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्स 71,000 च्या जवळ
- मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना वेगळ आरक्षण द्या, पण झुंडशाही थांबवा; भुजबळांनी सुनावले
- RBI Action: RBIची पाच सहकारी बँकांवर कारवाई, लाखोंचा दंडही ठोठावला