• Download App
    तब्बल ४५०० फूट व्यासाचा आणि १.४ किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावतोय। A new asteroid, approximately 4,500 feet in diameter, is approaching the Earth and will come close to our planet on August 21, at night.

    तब्बल ४५०० फूट व्यासाचा आणि १.४ किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावतोय

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : तब्बल ४५०० फूट व्यासाचा आणि १.४ किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. ताशी ९४ हजार १०८ किलोमीटर वेगाने तो २१ ऑगस्ट रोजी रात्री पृथ्वीच्या अधिक जवळ येईल, असा अंदाज खगोलाशास्त्रज्ञानी वर्तविला आहे. A new asteroid, approximately 4,500 feet in diameter, is approaching the Earth and will come close to our planet on August 21, at night

    नासाने या लघुग्रहाचे नामकरण 2016 AJ193, असे केले आहे. त्याला ‘संभाव्य धोकादायक’ यादीत टाकले आहे. घाबरण्याचे कारण नाही. कारण हा लघुग्रह पृथ्वी आणि चंद्राच्या ९ पट अंतरावरुन पृथ्वी पार करणार आहे.



    हा लघुग्रह ९४२०८ किलोमीटर प्रति तास अशा प्रचंड वेगाने प्रवास करतोय. १.४ किलोमीटर रुंदीचा हा लघुग्रह असून तो दुर्बिणीतून पाहता येणे शक्य असल्याने खगोलशास्त्रज्ञामध्ये त्यांच्याबाबत उत्सुकता आहे. हा लघुग्रह यानंतर २०६३ मध्ये पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल.

    हवाईच्या हॅलेकला वेधशाळेत असलेल्या पॅनोरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टीम (पॅन-स्टार) सुविधेद्वारे हे लघुग्रह पहिल्यांदा जानेवारी २०१६ मध्ये प्रथम दिसला. हा लघुग्रह काळा आणि अपारदर्शक आहे. दर ५.९ वर्षांनी सूर्याभोवती फिरतो आणि पृथ्वी ग्रहाच्या जवळ येतो, तथापि, नंतर तो गुरुग्रहाच्या कक्षे पलीकडे प्रवास करतो.

    A new asteroid, approximately 4,500 feet in diameter, is approaching the Earth and will come close to our planet on August 21, at night

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!