• Download App
    पेट्रोल डिझेल भडकल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे देशभर नोव्हेंबरमध्ये संपूर्ण पंधरवड्याचे आंदोलन । Congress will launch massive agitation against fuel price hike from Nov 14-29

    पेट्रोल डिझेल भडकल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे देशभर नोव्हेंबरमध्ये संपूर्ण पंधरवड्याचे आंदोलन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडल्यानंतर महागाई थांबायचे नाव घेत नाही. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने दिवाळी उलटल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवसांचे आंदोलन करण्याचे नियोजन आखले आहे. 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर संपूर्ण देशभर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते विविध प्रकारे आंदोलन करून केंद्रातल्या मोदी सरकारला घेरतील. Congress will launch massive agitation against fuel price hike from Nov 14-29

    काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते अनेक ठिकाणी पदयात्रा, निदर्शने याद्वारे जनजागृती करतील. देशातला एकही कानाकोपरा या आंदोलनापासून निसटणार नाही याची काळजी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. या संदर्भातले काटेकोर नियोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.



    या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस प्रथमच राष्ट्रव्यापी उपक्रम करताना दिसत आहे. यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना चेतना देण्याचे घाटत आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने देशातल्या प्रत्येक राज्यात तो पेट्रोल – डिझेल सारख्या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरताना दिसणार आहे. त्याला जर जनतेने चांगला प्रतिसाद दिला तर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा काँग्रेससाठी अनुकूल परिणाम दिसण्याची अपेक्षा आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्षातील संघटनात्मक पातळीवरची मरगळ यानिमित्ताने झटकण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

    – चिदंबरम यांचे टीकास्त्र

    पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला घेरले आहे. केंद्र सरकारने पंपावर विक्री होणाऱ्या पेट्रोल – डिझेल वरील कर कमीच केले पाहिजेत. रिझर्व बँकेने तसा आग्रह धरलेला आहे. तो मान्य केला पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा तरी दिलासा मिळेल, असे प्रतिपादन चिदंबरम यांनी केले आहे. हाच विषय काँग्रेस पक्ष देशभर दिवाळीनंतर आंदोलनाच्या रूपाने लावून धरणार आहे.

    Congress will launch massive agitation against fuel price hike from Nov 14-29

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!