• Download App
    |A modern strong and developed Maharashtra will complete the resolution of a developed India Devendra Fadnavis

    आधुनिक, सशक्त आणि विकसित महाराष्ट्र करणार विकसित भारताचा संकल्प पूर्ण – देवेंद्र फडणवीस

    या सुविधांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून राज्यात उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक येणार आहे


    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ मध्ये 35,000 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे आणि योजनांचे शुभारंभ, अनावरण, राष्ट्राला समर्पण आणि लाभाचे वितरण बुधवारी केले. यामध्ये 4900 कोटींहून अधिक किमतीचे रेल्वे, रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्राने ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ अंतर्गत विदर्भातील 91 सिंचन प्रकल्पांसाठी 13,500 कोटी वितरीत केले.या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.A modern strong and developed Maharashtra will complete the resolution of a developed India Devendra Fadnavis



    मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी योजना आणि प्रकल्पांचे शुभारंभ, अनावरण, राष्ट्राला समर्पण आणि लाभाचे वितरण:

    राष्ट्राला समर्पण

    •  ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ आणि ‘बळीराजा जल संजीवनी योजने’ अंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यात 2,750 कोटींचे सिंचन प्रकल्प
    •  675 कोटींची वर्धा-कळंब नवीन ब्रॉड गेज रेल्वे मार्ग आणि पॅसेंजर ट्रेन (39 कि.मी.)
    •  645 कोटींची नवीन आष्टी-अमळनेर ब्रॉड गेज रेल्वे मार्ग आणि पॅसेंजर ट्रेन (32 कि.मी.)
    • 3370 कोटींच्या पुणे-मिरज (जि. सांगली) रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणातील अंबाळे – वाठर आणि शेनोळी-मिरज टप्यातील दुहेरीकरणाचे काम
    •  483 कोटींचा वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 चे चौपदरीकरण (18 कि.मी.)
    • 291 कोटींचा साकोली-भंडारा जिल्हा सीमा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग (55.8 कि.मी.)
    • 378 कोटींचा सालीखुर्द-तिरोरा महामार्ग (42 कि.मी.)

    अनावरण

    •  यवतमाळ येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    शुभारंभ

    •  मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ, ओबीसी बंधू-भगिनींसाठी 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट, 375 कोटींचा पहिला हप्ता 2.5 लाख लाभार्थ्यांना हस्तांतरित
    •  34.4 कोटींच्या पुनर्विकसित सातारा रेल्वे स्टेशनचे उदघाटन
    •  1351.37 कोटींच्या फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे उदघाटन (38 कि.मी.)

    निधी वितरण

    •  ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान‘अंतर्गत राज्यातील 5,50,000 महिला बचत गटांना 825 कोटींचा फिरता निधी
    •  ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत 1,943 कोटींचा 16 वा हप्ता आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत 3,800 कोटींचा दुसरा आणि तिसरा हप्ता राज्यातील 87 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

    वितरण

    •  आयुष्मान भारत योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वाटप

    केंद्र आणि राज्य सरकार मिळून महिला, शेतकरी, युवा आणि गरिबांना सुखी, समृद्ध आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्ते, रेल्वे, हवाई कनेक्टिव्हिटी, वीज, पाणी सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे विकसित महाराष्ट्राचा पाया मजबूत होईल. या सुविधांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून राज्यात उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक येणार. त्यामुळे अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

    A modern strong and developed Maharashtra will complete the resolution of a developed India Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य