• Download App
    उजनी धरणात होडीतून फिरण्यास गेलेल्या मुंबईच्या तरुणासह मछिमाराचा बुडून मृत्यू|A fisherman drowned along with a young man from Mumbai who went for a boat ride in Ujani dam

    उजनी धरणात होडीतून फिरण्यास गेलेल्या मुंबईच्या तरुणासह मछिमाराचा बुडून मृत्यू

    मयतांची नावे समीर याकूब सय्यद आणि अल्ताफ एकबाल शेख(18) अशी आहेत.A fisherman drowned along with a young man from Mumbai who went for a boat ride in Ujani dam


    विशेष प्रतिनिधी

    चिकलनठाण : उजनी धरणात होडीतून फिरण्यास गेलेल्या एका मुंबईच्या तरुणासह मछिमाराचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.ही घटना करमाळा तालुक्यातील चिकलनठाण परिसरात घडली आहे.मयतांची नावे समीर याकूब सय्यद आणि अल्ताफ एकबाल शेख(18) अशी आहेत. या घटनेमुळे ऐन संक्रांतीच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे.



    नेमकी घटना काय घडली ?

    मयत समीर याकूब सय्यद हे करमाळा तालुक्यातील चिकलनठाण परिसरात राहतात.त्यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. सय्यद यांच्याकडे काल मुंबईहून चार पाहुणे आले होते.दरम्यान हे सर्व जण सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास होडीतून फेरफटका मारण्यासाठी सय्यद यांच्यासह उजनी धरणाच्या पाण्यात गेले होते.

    दरम्यान पाण्यात फेरफटका मारत असतानाच अल्ताफ शेख या तरुणाचा अचानक तोल गेल्याने तो पाण्यात पडला.दरम्यान अल्ताफला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी समीर सय्यद यांनी पाण्यात उडी मारली.मात्र अल्ताफने समीर यांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले.यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

    A fisherman drowned along with a young man from Mumbai who went for a boat ride in Ujani dam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले