नाशिक : बिहार मधल्या मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधींची हरियाणाच्या निमित्ताने vote chori ची वातावरण निर्मिती!!, हाच प्रकार त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जनतेच्या समोर आला. Rahul Gandhi
बिहार विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातले मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परंतु मतदानाच्या नेमक्या त्यादिवशी म्हणजे आज 5 नोव्हेंबर 2025 रोजी राहुल गांधींनी दिल्लीत काँग्रेसचे मुख्यालय इंदिरा भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन हरियाणामध्ये vote chori झाली, असा आरोप करून बिहार विधानसभा निवडणुकीत तसेच होणार असल्याचा दावा केला.
– हरियाणात 25 लाख मतांची चोरी
हरियाणा मध्ये 25 लाख मतांची चोरी झाली. 5 लाख 21000 मतदार दुबार आढळून आले. ब्राझील मधल्या एका मॉडेलने वेगवेगळ्या नावांनी 22 वेळा मतदान केले. एका बुथवर एका महिला मतदाराचे नाव 223 वेळा आले. 1,24177 मतदारांचे बनावट फोटो वापरले, असे वेगवेगळे दावे त्यांनी पत्रकार परिषदेत केले. ज्यांचा घराचा पत्ताच नाही, त्यांचे घर क्रमांक 0 आहेत, असे 93000 मतदार आढळले .निवडणुकीतील मतदान झाल्यानंतर हे सगळे मतदार गायब झाले, असा आरोपही राहुल गांधींनी केला. हरियाणा मध्ये काँग्रेसचा महाविजय हा पराभवात रूपांतर करण्याचे षडयंत्र रचले गेले. कारण काँग्रेस आणि भाजप यांच्या मतांमध्ये फक्त एक लाख 18 हजार मतांचा फरक होता, तरी भाजपचा मोठ्या प्रमाणावर विजय झाला, असा कांगावा राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींनी आधी अशीच पत्रकार परिषद घेऊन मोठे प्रेझेंटेशन करून महाराष्ट्रात vote chori करून भाजपने सरकार आणल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ताशेरे ओढले होते. आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा मुख्य निवडणूक आयुक्तांवर तसेच ताशेरे ओढले.
– निवडणूक आयोगाचे ताबडतोब उत्तर
राहुल गांधींच्या गेल्यावेळच्या पत्रकार परिषदेनंतर काही दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांना सगळी कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरे दिली होती. त्यावेळी त्यांना कोर्टात जायचा सल्ला दिला होता. परंतु, राहुल गांधी कोर्टात गेले नव्हते. पण आज मात्र राहुल गांधींनी हरियाणा संदर्भात पत्रकार परिषद घेताच निवडणूक आयोगाने सोशल मीडिया हँडलवर त्यांना ताबडतोब उत्तर दिले. निवडणूक आयोगाकडे त्यांनी अधिकृत तक्रार करावी. Vote chori चे सगळे पुरावे द्यावेत. शिवाय त्यांना कोर्टात जाण्याची मुभा आहेच, असे निवडणूक आयोगाने ताबडतोब स्पष्ट केले.
– political timing
परंतु या सगळ्यांमध्ये राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या political timing मात्र फारसे कुणी भाष्य केले नाही. राहुल गांधींनी उद्या होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी vote chori चा आरोप करून बिहारमध्ये तसेच होण्याची शक्यता व्यक्त करून आपल्या पराभवाची अप्रत्यक्ष कबुली दिली, याकडे कुणी फारसे लक्ष वेधले नाही.
A day before the Bihar polls, Rahul Gandhi creates an atmosphere of vote chori on the occasion of Haryana.
महत्वाच्या बातम्या
- Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण; सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागवला अहवाल; दिवाळीला फक्त 9 AQI स्टेशन कार्यरत होते
- Trump : ट्रम्प मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवू शकतात; ड्रग्ज कार्टेल्सवर ड्रोन हल्ले करण्याची योजना
- मतदार याद्यांवरून करा आरडाओरडा, पण आता निवडणुकांना सामोरे जा!!
- Tharoor : थरूर यांनी लिहिले- भारतात राजकारण कौटुंबिक व्यवसाय, गांधी कुटुंबाचे उदाहरण देऊन म्हटले-“गुणवत्तेवर आधारित व्यवस्था पाहिजे”