विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्या गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुन्हेगारांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सर्व मार्ग वापरत आहे, असे त्यांनी सांगितले.A bsconding economic offencers have to be return to country, Prime minister cautionedcrime is not synonymous with country
एका चर्चा सत्रात बोलताना पंतप्रधान म्हणाले, आम्ही धोरणे आणि कायद्यांवर अवलंबून आहोत आणि फरारी आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी राजनयिक माध्यमांचाही वापर केला आहे. संदेश अगदी स्पष्ट आहे, आपल्या देशात परत या. आमचे प्रयत्न सुरूच आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणत्याही आर्थिक गुन्हेगाराचे नाव घेतले नाही, पण केंद्र सरकारने विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या फरार आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न आणखी वाढवले आहेत. थकबाकीदारांकडून पाच लाख कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये त्यांचे सरकार आल्यापासून बँकांच्या आरोग्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. भारतीय बँका आता देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा ओतण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे भारताला स्वावलंबी होण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले.
गेल्या सहा-सात वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्राचे बळकटीकरण झाले, असे सांगून मोदी म्हणाले, आम्ही बँकांची एनपीए समस्या सोडवली आहे. बँकांमध्ये नवीन भांडवल टाकले आहे. दिवाळखोरी कायदा आणला आहे आणि कर्ज वसुली न्यायाधिकरणांना अधिकार दिले आहेत.
A bsconding economic offencers have to be return to country, Prime minister cautionedcrime is not synonymous with country
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापूर डेपोट मधील निलंबित 5 एसटी कर्मचाऱ्यांची जमसमाधी घेण्याची तयारी ; एमएसआरटीसी वर्कर्स असोसिएशनचे हेड उत्तम पाटील
- शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार काय म्हणाले???
- आपल्या मुलांना रस्त्यावर विकणाऱ्या त्या पाकिस्तानी व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य काय?