मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उड्डाणपुलावर अगोदर झालेला अपघात पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर वेगवान कारने धडक दिली, ज्यामध्ये ९ जण ठार आणि १३ जखमी झाले. 9 killed in accident on Iskcon flyover in Ahmedabad
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सरखेज-गांधीनगर महामार्गावरील इस्कॉन उड्डाणपुलावर थार वाहन आणि डंपर यांच्यात धडक झाली होती. अपघात पाहण्यासाठी पुलावर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, भरधाव वेगात असलेली जग्वार कार लोकांना तुडवत गेली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश आहे, जे थार आणि डंपर अपघातानंतर कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले होते.
या अपघातात कार चालकही जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुहेरी अपघातानंतर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण इस्कॉन पूल बंद केला.
9 killed in accident on Iskcon flyover in Ahmedabad
महत्वाच्या बातम्या