• Download App
    Donald Trump संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!

    संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!

    •  डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड”; पण केली भारत + चीन आणि सगळ्या युरोप वर प्रचंड आगपाखड!!

    संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!, असाच भास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत तब्बल 57 मिनिटे भाषणे केले. या सगळ्या भाषणामध्ये आपण स्वतः आणि अमेरिका किती महान आणि इतर देश किती लहान असाच त्यांचा भाव होता. म्हणूनच त्यांनी जगातली 7 युद्धे थांबविण्याचे श्रेय स्वतःकडे घेतले आणि संयुक्त राष्ट्र संघाला ठोकून काढले. त्याचवेळी त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धासाठी त्या दोन देशांना जबाबदार ठरवण्यापेक्षा भारत आणि चीन यांना जबाबदार ठरविले. त्याचबरोबर युरोपला सुद्धा त्यांच्या युद्धात ओढून आणले. स्वतः मात्र शांततेच्या मसीहा असल्याचा बुरखा पांघरला. Donald Trump

    डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड” घेऊन भारत + चीन आणि सगळ्या युरोप वर आगपाखड केली. चीन आणि भारत हे दोन देश रशियाकडून तेल विकत घेतात त्यामुळे रशियाला युद्ध चालविण्यासाठी फंडिंग करतात, असा आरोप ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प भारत विरुद्ध आधी आगपाखड करतच होते. अधून मधून ते चीनला डिवचत होते. पण आज संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत त्यांनी युरोपला सुद्धा घेरले.

    भारत आणि चीन रशियाला फंडिंग करतच आहेत, पण युरोप सुद्धा रशियन गॅस विकत घेण्यापासून स्वतःला थांबवत नाही. युरोपातले सगळे देश स्वतः विरोधात रशियाला लढवण्यासाठी स्वतःच फंडिंग करतायेत हे त्यांना कळत नाही, असा टोमणा डोनाल्ड ट्रम्प यांनी मारला. यावेळी युरोपियन युनियनमधल्या बहुतांश देशांचे राष्ट्रप्रमुख त्या आमसभेत उपस्थित होते. रशियाला होत असलेले फंडिंग थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पण एकाच वेळी त्यांनी भारत चीन आणि सगळे युरोपीय देश यांना एका झटक्यात अमेरिकेच्या विरोधात उभे केले. त्याचवेळी रशियाविरुद्ध मोठे निर्बंध लादण्याची गर्जना देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

    यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाला सुद्धा खडे बोल सुनावले. जगातली सगळी युद्ध थांबविण्याचे काम संयुक्त राष्ट्र संघाचे आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धासकट 7 युद्धे थांबविण्याचे काम मला करावे लागले, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

    डोनाल्ड ट्रम्प जे बोलले नाही ते

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या भाषणामुळे अमेरिका एकटीच शांततेसाठी लढते आहे आणि सगळे जग युद्धखोर बनले आहे, असा आभास निर्माण झाला.

    पण ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा मसीहा असा बुरखा पांघरून संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भाषण केले, त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला आमचा बगराम बेस पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात द्या, नाहीतर गंभीर परिणाम भोगायला तयार व्हा अशी दमबाजी केली, त्याविषयी चकार शब्द उच्चारला नाही.

    त्याचबरोबर इराणवर अमेरिकेने अभूतपूर्व बॉम्बिंग करून सुद्धा अमेरिकेला अपेक्षित असलेली अण्वस्त्रे इराणच्या भूमीत हस्तगत करता आली नाहीत, याविषयी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प काही बोलले नाहीत.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविण्याचे श्रेय किमान 50 वेळा श्रेय घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा युद्धखोर जनरल असीम मुनीर याच्याबरोबर खासगी बिटकॉइन करार केला. त्याला diplomatic lunch मध्ये आपल्या बरोबरीचे स्थान दिले, त्याविषयी डोनाल्ड ट्रम्प यांनी अवाक्षर उच्चारले नाही.

    पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी एकत्र येऊन इस्लामिक नाटो साठी मोठी पावले उचलली, याविषयी डोनाल्ड ट्रम्प काहीही बोलले नाहीत.

    80th session of the United Nations General Assembly (UNGA), US President Donald Trump says

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Italy : इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी तोडफोड-जाळपोळ केली; 60 पोलिस जखमी; पॅलेस्टाईनला मान्यता न दिल्याबद्दल संताप

    Macron : न्यूयॉर्क पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी रोखली:मॅक्रॉन यांनी ट्रम्पला फोन केला, म्हणाले- तुमच्यामुळे रस्ता बंद, लवकर रस्ता मोकळा करा

    Trump : ट्रम्प यांच्या पक्षाचा नेता बरळला- हनुमानजी खोटे भगवान; आपण ख्रिश्चन देश, येथे मूर्ती का बसवू देत आहात?