वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघ (न्यूयॉर्क) : डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली “शांततेची कड”; पण केली भारत चीन आणि सगळ्या युरोप वर आगपाखड!!, असला प्रकारात संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत घडला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित केले. त्यावेळी बोलताना ट्रम्प यांनी चीन आणि भारत यांना रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धासाठी जबाबदार ठरविले. चीन आणि भारत हे दोन देश रशियाकडून तेल विकत घेतात त्यामुळे रशियाला युद्ध चालविण्यासाठी फंडिंग करतात, असा आरोप ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प भारत विरुद्ध आधी आगपाखड करतच होते. अधून मधून ते चीनला डिवचत होते. पण आज संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत त्यांनी युरोपला सुद्धा घेरले.
भारत आणि चीन रशियाला फंडिंग करतच आहेत पण युरोप सुद्धा रशियन गॅस विकत घेण्यापासून स्वतःला थांबवत नाही. युरोपातले सगळे देश स्वतः विरोधात रशियाला लढवण्यासाठी स्वतःच फंडिंग करतायेत हे त्यांना कळत नाही, असा टोमणा डोनाल्ड ट्रम्प यांनी मारला. यावेळी युरोपियन युनियनमधल्या बहुतांश देशांचे राष्ट्रप्रमुख त्या आमसभेत उपस्थित होते. रशियाला होत असलेले फंडिंग थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पण एकाच वेळी त्यांनी भारत चीन आणि सगळे युरोपीय देश यांना एका झटक्यात अमेरिकेच्या विरोधात उभे केले. त्याचवेळी रशियाविरुद्ध मोठे निर्बंध लादण्याची गर्जना देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाला सुद्धा खडे बोल सुनावले. जगातली सगळी युद्ध थांबविण्याचे काम संयुक्त राष्ट्र संघाचे आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धासकट 7 युद्धे थांबविण्याचे काम मला करावे लागले, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या भाषणामुळे अमेरिका एकटीच शांततेसाठी लढते आहे आणि सगळे जग युद्धखोर बनले आहे, असा आभास निर्माण झाला. जो बिलकुल खरा नाही.
80th session of the United Nations General Assembly (UNGA), US President Donald Trump
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या भाषणात सामान्यांना हवे ते मुद्दे जोरावर; विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर!!
- Yasin Malik, : यासीन मलिकचा कबुलीनामा- व्हीपी-मनमोहनपर्यंत 7 सरकारांनी मला चर्चेत सामील केले
- मोदींच्या GST Reforms भाषणाचे भारतीय व्यापार महासंघाकडून स्वागत; पण काँग्रेस + तृणमूल काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांची टीका
- Himachal : हिमाचलमध्ये 46 ठिकाणी ढगफुटी, 424 जणांचा मृत्यू; शिमलामध्ये भूस्खलन