• Download App
    काश्मीर खोऱ्यात अवघ्या सात महिन्यांत ७८ दहशतवाद्यांचा खात्मा 78 terrorist neutralised in JK in seven months

    काश्मीर खोऱ्यात अवघ्या सात महिन्यांत ७८ दहशतवाद्यांचा खात्मा

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : गेल्या सात महिन्यांत काश्मीलर खोऱ्यात ७८ दहशतवादी मारण्यात यश आले आहे. त्यापैकी ३९ दहशतवादी लष्करे तय्यबाचे होते तर अन्य दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन, अल बद्र, जैश महंमद आणि अन्सार गजवातुल हिंदशी जोडलेले आहेत. 78 terrorist neutralised in JK in seven months

    काल शहरातील आलमदार कॉलनीत आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. अहमद सोफी आणि बिलाल अहमद असे मृत दहशतवाद्यांची नावे असून ते लष्करे तय्यबा संघटनेसाठी काम करत होते. दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते श्रीनगरच्या नातीपोरा भागातील रहिवासी होत.

    दोन्ही दहशतवादी १४ डिसेंबर २०२० पासून घातपाती कारवायांत सामील होते. हे दहशतवादी तीन घटनांत सहभागी होते आणि जून महिन्यांपासून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात होती. काल त्यांच्याबाबत माहिती मिळाली असता श्रीनगरच्या इदगाह भागाला वेढा घातला. यावेळी त्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु त्यांनी दाद दिली नाही आणि चकमक सुरू झाली. त्यात दोघेही मारले गेले. ते दोघेही लष्करे तय्यबात सक्रिय होते.

    78 terrorist neutralised in JK in seven months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : मोदी म्हणाले-भारत 21व्या शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटातून बाहेर पडला; घरगुती सिलिंडर 2 हजारांना झाले असते, पण पुरवठा कमी होऊ दिला नाही

    PM Modi : मोदींनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन केले; PM म्हणाले- येथे दरवर्षी 20 कोटी चिप्स बनतील; 5 महिन्यांत तिसरा प्लांट सुरू

    UAPA Terrorist List : यूएपीए लिस्ट:श्रीराम मंदिराची रेकी करणाऱ्या मुसद्दिकसह 23 अतिरेकी घोषित, 17 पाकिस्तानी, 6 भारतीयांचा समावेश