• Download App
    करणी सेनेच्या प्रमुखाच्या हत्येच्या 7 महिन्यांपूर्वी पंजाब पोलिसांनी राजस्थानला केले होते अलर्ट!|7 months after the murder of Karni Senchaya chief Punjab Police is on alert in Rajasthan

    करणी सेनेच्या प्रमुखाच्या हत्येच्या 7 महिन्यांपूर्वी पंजाब पोलिसांनी राजस्थानला केले होते अलर्ट!

    जाणून घ्या पंजाब पोलिसांनी नेमके काय कळवले होते?


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी (५ डिसेंबर २०२३) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ आज राजस्थान बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थान पोलिसांना अशा प्रकारची घटना घडणार असल्याबाबत आधीच माहिती देण्यात आल्याचेही समोर आले आहे.7 months after the murder of Karni Senchaya chief Punjab Police is on alert in Rajasthan



    पंजाब पोलिसांनी हत्येच्या 7 महिन्यांपूर्वी राजस्थान पोलिसांना खुनाच्या कटाची लेखी माहिती पाठवली होती. पंजाब पोलिसांनी राजस्थान पोलिसांना आधीच अलर्ट केले होते की, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड संपत नेहरा, जो बंथिडा तुरुंगात बंद आहे, त्याच्या हत्येचा कट रचत आहे. हत्येचा कट रचण्यासाठी त्याने एके-47 ची व्यवस्था केल्याचेही पोलिसांनी सांगितले होते.

    सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येनंतर रोहित गोदाराने फेसबुकवर हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी लिहिले, ‘बंधूंनो, आज सुखदेव गोगामेडी यांची हत्या झाली. या हत्येची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. हा खून मीच केला आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की गोगामेडी आमच्या शत्रूंना मदत करून त्यांना मजबूत करत असे.

    यासोबतच गोदराने फेसबुकवर इशारा देत म्हटले की, गोगामेडीची हत्या हा आमच्या बाकीच्या शत्रूंसाठी धडा आहे की तुम्ही आमच्या मार्गात आलात तर तुमचेही असेच हाल होणार आहेत.

    7 months after the murder of Karni Senchaya chief Punjab Police is on alert in Rajasthan

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!