• Download App
    जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; 'ED'ची कारवाई 538 crore property of Jet Airways owner Naresh Goyal seized Action by ED 

    जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई

    ३१ ऑक्टोबर रोजी ईडीने नरेश गोयल आणि इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ होत आहे. कॅनरा बँक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांची ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गोयल यांच्याशिवाय इतर पाच जणांवरही ईडीने कारवाई केली आहे. 538 crore property of Jet Airways owner Naresh Goyal seized Action by ED

    ३१ ऑक्टोबर रोजी ईडीने नरेश गोयल आणि इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. कॅनरा बँक फसवणूक प्रकरणी ईडीने नरेश गोयल यांना १ सप्टेंबर रोजी अटक केली होती. गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.

    सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फसवणुकीचे प्रकरण समोर आले, तेव्हा मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात गोयल यांच्यासह त्यांची पत्नी अनिता गोयल आणि कंपनीच्या काही माजी अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत.

    538 crore property of Jet Airways owner Naresh Goyal seized Action by ED

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    तमिळनाडूमध्ये चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्ती; स्टालिन यांचा राजकीय सहकाऱ्यांवर विश्वास उरला नसल्याची कबुली!!

    Odisha Student : ओडिशात आत्मदहनानंतर गंभीर भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू; लैंगिक छळामुळे घेतले होते पेटवून

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!