• Download App
    कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार नुकसान भरपाई; केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी50,000 Rs in case of death due to corona; Supreme Court approves Centre's proposal

    कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार नुकसान भरपाई; केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्या प्रस्तावाला न्यायालयाने मान्यता दिली आहे.50,000 Rs in case of death due to corona; Supreme Court approves Centre’s proposal

    केंद्र सरकारकडून करण्यात येणारी ही मदत इतर कल्याणकारी योजनांपेक्षा वेगळी आहे, असे केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले. कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यास संबंधित कुटुंबाला ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळणार आहे.


    अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा कहर, आयसीयूमध्ये रुग्णांसाठी जागा नाही


     

    कोरोना मृतांच्या कुटुंबाला देण्यात येणारी ही मदत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कोषातून देण्यात येणार आहे. २३ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती एएस बोपन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्राला कोरोना मृतांना ५० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.

    सर्वोच्च न्यायालयाने देशात कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूची भरपाई देण्याचे आदेश ३० जून रोजी दिले होते. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला ६ आठवड्यांत भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतर राज्यांना माहिती देण्यास सांगितले होते. अशा आपत्तीमध्ये लोकांना नुकसान भरपाई देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. पण नुकसानभरपाईची रक्कम किती असेल हे ठरवण्याचे काम न्यायालयाने सरकारवर सोडले होते. त्यावर सरकारने भरपाईची रक्कम ५० हजार देण्याचे निश्चित करून तसा प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर झाला आहे.

    .50,000 Rs in case of death due to corona; Supreme Court approves Centre’s proposal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’