वृत्तसंस्था
कोल्लम : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अद्याप तमिळनाडू आणि केरळ मध्येच आहे. ती यात्रा काँग्रेसच्या विविध कारनाम्यांमुळे वादग्रस्त ठरत आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान प्रामुख्याने चर्चेस आणि मशिदी यांना भेटी देताना दिसले आहेत, इतकेच नाही तर त्यांनी वादग्रस्त आणि हिंदू हेट स्पीच देणारे ख्रिस्ती धर्मगुरू फादर जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली आहे.500 won’t work, pay Rs 2000!!; Congress workers bullied vegetable seller in Bharat Jodo Yatra in Kerala!!
आता त्या पलिकडे जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची दादागिरी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते मंडईत घुसले आणि त्यांनी भारत जोडो यात्रेसाठी स्थानिक भाजीविक्रेत्यांकडून वर्गणी गोळा करायला सुरुवात केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव बघून काही भाजी विक्रेत्यांनी वर्गणी दिलीही, पण एस. फवाज नावाच्या भाजीविक्रेत्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी 5000 रुपये चालणार नाहीत, 2000 रुपये दे असे सांगत त्याला दमदाटी केली. इतकेच नाही तर भाजी तोडण्याचा त्याचा वजन काटा मोडला. भाजी फेकून दिली.
हे सगळे का??, तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी व्हावी आणि त्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते वर्गणी रुपात रूपात मागत असलेली खंडणी सर्वसामान्य जनतेने द्यावी, यासाठी!!… आणि ती दिली नाही, तर काँग्रेस कार्यकर्ते अशी दमदाटी करणार याची झलक कोल्लममध्ये दिसली आहे.
या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकेच नाही, तर या व्हिडिओची दखल घेत एएनआय या वृत्तसंस्थेने देखील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या दादागिरीची बातमी दिली आहे. तसेच ज्याच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादागिरी केली त्या भाजीविक्रेत्या फवाज देखील आपली व्यथा या वृत्तसंस्थेकडे मांडली आहे.
500 won’t work, pay Rs 2000!!; Congress workers bullied vegetable seller in Bharat Jodo Yatra in Kerala!!
महत्वाच्या बातम्या
- Roger Federer Profile : टेनिस कोर्टवर प्रेम, दोनदा जुळ्या मुलांचा बाप… अशी आहे टेनिसपटू रॉजर फेडररची प्रेमकहाणी
- रॉजर फेडररची निवृत्ती : टेनिसचा बादशाह रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा, लेव्हर कपमध्ये खेळणार शेवटचा सामना
- लखीमपूर खिरी प्रकरण : पीडितेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर, सीएम योगींचे फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश
- मनी लाँडरिंग प्रकरण : जॅकलिननंतर अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांकडून पाच तास कसून चौकशी