• Download App
    जगभरातील ५० पेक्षाही अधिक देश भारताचे ‘को-विन’ वापरण्यासाठी उत्सुक । 50 countries interested in covin app

    जगभरातील ५० पेक्षाही अधिक देश भारताचे ‘को-विन’ वापरण्यासाठी उत्सुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘को-विन’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची अन्य देशांत देखील चर्चा असून ५० पेक्षा अधिक देशांनी या ॲपच्या वापरामध्ये रस दाखविला आहे. 50 countries interested in covin app

    कॅनडा, मेक्सिको, नायजेरिया आणि पनामासारख्या देशांचा यामध्ये समावेश आहे. व्हिएतनाम, इराक, डोमेनिकन रिपब्लिक, संयुक्त अरब अमिराती या देशांनी को-विन प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शविली आहे.



    हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर भारत अन्य देशांना मोफत द्यायला तयार असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे ओपन सोर्स व्हर्जन तयार करण्याचे निर्देश दिले असून ज्या देशांना याची गरज आहे ते त्यांना मोफत उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. मध्य आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांनी को-विनसारखी यंत्रणा वापरण्याची तयारी दर्शविली आहे.

    जगभरातील आरोग्य आणि तंत्रज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञांचे एक मोठे जागतिक संमेलन ५ जुलै रोजी पार पडणार असून त्यामध्ये ही यंत्रणा नेमकी कशी काम करते याचे सादरीकरण भारताकडून करण्यात येईल. पहिल्या पाच महिन्यामध्ये कोविनच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या ३० कोटींच्याही पुढे गेली आहे.

    50 countries interested in covin app

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार