• Download App
    हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीसाठी लेखन करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध अटक मोहीम |Journalist arrested in Hong Kong

    हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीसाठी लेखन करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध अटक मोहीम

    विशेष प्रतिनिधी

    हॉंगकॉंग  : हॉंगकॉंग येथे बंद पडलेले लोकशाही समर्थक वर्तमानपत्र ‘ॲपल डेली’त संपादकीय लेखन करणाऱ्या पत्रकारास रविवारी रात्री विमानतळावर अटक करण्यात आली. ते शहराबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना हॉंगकॉंग पोलिसांनी ताब्यात घेतले.Journalist arrested in Hong Kong

    संपादकीय लेखक फंग वाई कॉंग यांना राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी परदेशाशी हातमिळवणी केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली आहे.५७ वर्षीय संपादकीय लेखक फंग यांना अटक केली तेव्हा ते ब्रिटनला जाण्याचा प्रयत्न करत होते.

    गेल्या दोन आठवड्यात ॲपल डेलीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अटकसत्र मोहीम राबवण्यात येत असून तुरुंगात जाणारे फंग हे सातवे कर्मचारी आहेत. तसेच ते दुसरे संपादकीय लेखक आहेत.हॉंगकॉंगमधील अधिकारी हे अर्ध स्वायत्त शहरात लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून शहरातील बहुतांशी लोकशाही समर्थक नेत्यांना अटक केली जात आहे.

    तसेच लोकप्रतिनिधींचा विरोधी सूर कमी करण्यासाठी हॉंगकॉंगमध्ये निवडणूक कायद्यात सुधारणा केली जात आहे. गेल्या आठवड्यात ॲपल डेलीने शेवटचा अंक छापला. कर्मचाऱ्यांना सुरक्षा तसेच वेतन देण्यास असमर्थ असल्याचे सांगून वर्तमनापत्राचे प्रकाशन बंद करण्यात आले.

    Journalist arrested in Hong Kong

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    अमेरिकेने युक्रेनला गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली; रशियात 300 किमीपर्यंत हल्ल्यास सक्षम