विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर 370 कलम हटवल्यानंतर नेमके कोणते बदल झाले? असा प्रश्न विचारणाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने प्रत्युत्तरे मिळत आहेत. “द काश्मीर फाईल्स” सिनेमा सुपरहिट होतो आहे. राज्यातले आरक्षणाचे धोरण बदलले आहे. आता राज्यात सर्व अनुसूचित जाती जमाती, ओबीसी यांना आरक्षण मिळत आहे. 370 Removal Impact: Construction of Sharda Temple in Titwal on Line of Actual Control in Kashmir begins !!
त्या पलीकडे जाऊन काश्मीर खोऱ्यात महत्त्वाचा बदल घडत आहे. येथील ऐतिहासिक वारसा असलेला अनेक मंदिरांचे पुनरुज्जीवनाचा आराखडे बनत आहेत. यातले अत्यंत महत्त्वाचे मंदिर शारदा मंदिर याच्या बांधकामाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. खुद्द शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शारदा पीठमचे हे मंदिर आहे. काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील तितवाला मध्ये हे मंदिर आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळच असलेल्या तितवाला मध्ये या मंदिराचे शारदा मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. मंदिर समितीचे प्रमुख आणि शारदा बचाव समितीचे अध्यक्ष रवींद्र पंडित यांनी ही माहिती दिली आहे.
आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले शारदा पीठम सध्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आहे. शारदा पीठ यात्रेला अनेक शतकांची मोठी परंपरा आहे. अशी शारदा पीठाची यात्रा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने मध्ये शारदा मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. शारदा मंदिराच्या आराखड्याला दक्षिणेतील शारदा पीठमने देखील अधिमान्यता दिली आहे. तितवाल मधील मंदिराच्या कामाचे भूमिपूजन 2021 मध्ये झाले होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हे काम सुरू करताना काश्मिरी पंडित यांचा मोठा समुदाय शीख समुदाय आणि स्थानिक मुस्लिम समाज देखील उपस्थित होता, असे राकेश पंडित यांनी सांगितले आहे.
– अमरनाथ यात्रीनिवास लवकरच पूर्णत्वाला
जम्मू काश्मीर 370 कलम म्हटल्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंसाठी दोन मोठे यात्री निवास जम्मू परिसरात आणि काश्मीर परिसरात बांधण्यात येत आहेत. त्याचे बांधकाम 2020 मध्ये सुरू झाले असून ते लवकरच पूर्ण होईल. सुमारे 6000 यात्रेकरूंची यानिमित्ताने उत्तम सोय होईल. अमरनाथ यात्रेकरूंच्या यात्री निवास आणि पाठोपाठ आता दीर्घ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेले शारदा मंदिर पुन्हा बांधले जात आहे. त्यामुळे शारदा मंदिर यात्रा देखील लवकरच सुरू झालेली दिसेल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने देखील व्यक्त केला आहे.
370 Removal Impact : Construction of Sharda Temple in Titwal on Line of Actual Control in Kashmir begins !!
महत्त्वाच्या बातम्या
- दोन दिवसीय संपाचा आज दुसरा दिवस; आजही बँकिंग सेवा प्रभावित होणार
- Maharashtra Electricity Workers Strike : महाराष्ट्राला अंधाराचा धोका; वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, उर्जामंत्र्यांसमवेत आजची बैठक रद्द!!
- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ
- युक्रेनचा रशियाशी तुर्कीमध्ये या आठवड्यात संवाद समोरासमोर चर्चा ही एक संधी; परिस्थिती खूप बिघडली