• Download App
    28 मे 2023 विलक्षण राजकीय योगायोग; सावरकर जयंती; नव्या आत्मनिर्भर संसदेचे उद्घाटन; राहुल गांधींचा अमेरिका दौरा सुरू!! 28 may savarkar jayanti, inauguration of new parliament, rahul Gandhi starting his USA visit

    28 मे 2023 विलक्षण राजकीय योगायोग; सावरकर जयंती; नव्या आत्मनिर्भर संसदेचे उद्घाटन; राहुल गांधींचा अमेरिका दौरा सुरू!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिनांक 28 मे 2023 रोजी एक विलक्षण राजकीय योगायोग तयार झाला आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140 वी जयंती आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारताच्या नव्या संस्थेचे उद्घाटन करणार आहेत आणि नेमका त्याच दिवशी राहुल गांधींचा अमेरिका दौरा सुरू होत आहे. 28 may savarkar jayanti, inauguration of new parliament, rahul Gandhi starting his USA visit

    28 मे 2023 रोजी महाराष्ट्रात प्रथमच शासकीय पातळीवर सावरकर जयंती साजरी होणार आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे वेगवेगळ्या घोषणा करणे अपेक्षित आहे. यामध्ये सावरकर वाङ्मय सरकारी प्रकाशन द्वारे जनतेला उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर काही सरकारी विकास प्रकल्पांना सावरकरांची नावे देणे यांचा समावेश आहे.


    राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे सरकारकडून खास गिफ्ट ! Rajeev Gandhi यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा…


    पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मचरित्र भारताच्या नव्या संसदेचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना तसे निमंत्रण दिले आहे. 1930 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या संसदेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात भारतीय लोकशाही भारतीयांनी बांधलेल्या संसदेच्या सदनात प्रवेश करते आहे. पण नेमका याच दिवशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौराही सुरू होत आहे.

    आधीच्या नियोजनानुसार राहुल गांधी हे 31 मे 2023 रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु त्यांनी हा दौरा अलिकडे ओढला असून 28 मे 2023 रोजी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. 29 आणि 30 मे या दोन दिवशी त्यांचे भरगच्च कार्यक्रम असून त्यामध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतल्या एका कार्यक्रमात ते सहभागी होतील, तसेच भारतीय समुदायाला ते एक-दोन ठिकाणी संबोधित करतील. अमेरिकेचा त्यांचा दौरा 10 जून पर्यंत असणार आहे.

    आत्मनिर्भर भारतीय संसदेच्या उद्घाटन समारंभाला सत्ताधारी भाजप बरोबरच बाकी सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना आणि खासदारांना लोकसभा सचिवालयाने निमंत्रण पाठवले आहे. परंतु राहुल गांधींचा अमेरिका दौरा 28 मे या दिवशीच सुरू होणार असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील किंवा नाही याविषयी शंका आहे.

    28 may savarkar jayanti, inauguration of new parliament, rahul Gandhi starting his USA visit

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!