विशेष प्रतिनिधी
लखनौ : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारीही देवस्थानांवरून आणखी ११ हजार लाऊडस्पीकर काढण्यात आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला. 21 thousand 963 loudspeakers installed in Uttar Pradesh
कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, शासनाच्या सूचनेनुसार उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत आतापर्यंत धार्मिक स्थळांवरून २१ हजार ९६३ ध्वनिक्षेपक खाली आणण्यात आले आहेत. त्याचबरोबर ४२३३२ धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. यामध्ये सर्व धर्माच्या धर्मगुरूंचे पूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत २९८०८ धर्मगुरूंशी संवाद साधला असून त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.
अलविदा आणि ईदच्या नमाजासाठी उत्तम व्यवस्था
शुक्रवारी अलविदा नमाज अदा करण्यात येणार असल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. त्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्यभरात ३१ हजार १५१ ठिकाणी अलविदा नमाज अदा करण्यात येणार आहे. यामध्ये २७०५ संवेदनशील ठिकाणे आहेत. ईदनिमित्त ७४३६ ईदगाहांमध्ये नमाज अदा होणार आहे. १९९४९ मशिदींमध्येही ईदची नमाज अदा केली जाईल. ईदच्या दिवसासाठीही २८४६ ठिकाणे संवेदनशील ठिकाणांच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत.
21 thousand 963 loudspeakers installed in Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा
- समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
- शेतकरी मेळाव्यांमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे राकेश टिकैत यांचा भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा