वृत्तसंस्था
गुवाहाटी : 2024 मधल्या लोकसभा निवडणुका अजून दोन वर्षे लांब आहेत. तरीसुद्धा विविध सर्वेक्षणे, अनेक नेत्यांची भाकिते यामुळे निवडणूक आत्तापासूनच चर्चेत आहे. असेच एक भाकित आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केले आहे. 2024 च्या निवडणुकीत भले राहुल गांधी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत असतील पण ते काही महात्मा गांधी नव्हेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस 30 ते 35 जागांवर आटोपेल, अशा शब्दात आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.2024: Rahul Gandhi is not Mahatma Gandhi, Congress will win 30-35 seats; Hemant Vishwasharma’s attack
राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर देखील विश्व शर्मा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. राजस्थान राज्य काँग्रेसने रेल्वे स्टेशन सारखे बनवले आहे. राज्यसभा निवडणुकीत सगळे उमेदवार त्यांनी इकडून तिकडून गोळा करून राजस्थानात पाठवले आहेत.
बाकीच्या राज्यांमध्येही काँग्रेस हायकमांडने आपल्या पसंतीचे उमेदवार लादले आहेत. काँग्रेसच्या हायकमांडच्या अशाच वर्तणुकीमुळे पक्षांची अवस्था बिकट झाली आहे आणि म्हणूनच 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी घरी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत असतील तरी काँग्रेस 30 ते 35 जागा मिळू शकेल त्यापेक्षा जास्त जागा मिळवण्याची काँग्रेसची क्षमता नाही, अशा शब्दांत त्यांनी वाभाडे काढले.
मदरसा शिक्षणासंदर्भात देखील हेमंत विश्वशर्मा यांनी परखड मत व्यक्त केले. मदरसा शिक्षणामुळे मुस्लिम विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत मागे पडतात. त्यांच्या धार्मिक कट्टरता वाढते आणि अंतिमतः त्यांचे वैयक्तिक कारण नुकसान होतेच पण त्यातून देशाला धोका उत्पन्न होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
2024: Rahul Gandhi is not Mahatma Gandhi, Congress will win 30-35 seats; Hemant Vishwasharma’s attack
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका : राज्यात 1089 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईत 11 वॉर्ड हॉटस्पॉट घोषित
- आधी पटोले आता चव्हाणांचा ठाकरेंवर वार ; मविआत काँग्रेसला चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप, पक्षश्रेष्ठींना तक्रार करणार
- द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला का आहे बंडाळीची चिंता? कोणत्या राज्यात काय आहे परिस्थिती? वाचा सविस्तर
- नोकरीची बातमी : महाराष्ट्रात विविध खात्यांमध्ये 2,75000 जागांसाठी लवकरच नोकरभरती!!