प्रतिनिधी
नूह : हरियाणातील दंगलग्रस्त नूह भागात राज्य सरकारने बुलडोझर कारवाई करून घुसखोर रोहिंग्यांच्या 200 बेकायदेशीर झोपडपट्ट्या पाडून टाकल्या. या झोपड्यांमध्ये नूहच्या हिंसाचारात सामील असणारे आणि दगडफेक करणारे घुसखोर रोहिंग्या आरोपी राहत होते, अशी पोलिसांची माहिती आहे. यापैकी अनेकजण अवैध स्थलांतरित होते. 200 illegal huts of Rohingya infiltrators destroyed in a bulldozer operation in Nuh
या घुसखोर रोहिंग्यांनी तावडू भागात मोहम्मद पुरा रोडवर सरकारी जमिनीवर कब्जा करून 200 झोपड्या उभारल्या होत्या. हरियाणा सरकारने या झोपड्यांवर बुलडोझर चालवला. त्यातील अनेकांवर नूह हिंसाचारात सामील झाल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आले होते. दगडफेकीसाठी वापरल्या जाणार्या घरांसाठीही अशीच कारवाई करण्याचे नियोजन आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशाच्या धरतीवर हरियाणा देखील बुलडोझर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार पोलिसांच्या प्रचंड फौज फाट्यासह तावडूच्या मोहम्मद पुरा भागात जाऊन सरकारी यंत्रणांनी बेकायदा झोपड्यांवर बुलडोजर चालवत त्या उद्ध्वस्त केल्या.
200 illegal huts of Rohingya infiltrators destroyed in a bulldozer operation in Nuh
महत्वाच्या बातम्या
- पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही
- देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त
- हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार
- विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार