• Download App
    20 लाख रोजगार, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, वीज बिलमध्ये कपात आणि बरंच काही! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी दिली बरीच आश्वासने | 20 lakh jobs, up to 10 lakh free treatment, reduction in electricity bills and much more! Priyanka Gandhi gave many promises on the backdrop of Uttar Pradesh Assembly elections

    20 लाख रोजगार, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, वीज बिलमध्ये कपात आणि बरंच काही! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी दिली बरीच आश्वासने

    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून कॉंग्रेसच्या प्रतिज्ञा यात्रेला सुरूवात केली होती. ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास 20 लाख लोकांना नोकरी देण्याचे आवाहन केले होते. आता प्रियंका गांधी यांनी ट्विटरद्वारे आणखी एक आश्वासन दिले आहे. ‘जर पक्ष राज्यात सरकार स्थापन करेल तर 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आरोग्यसुविधा देण्यात येतील. अशी घोषणा प्रियांका गांधी यांनी केली आहे.

    20 lakh jobs, up to 10 lakh free treatment, reduction in electricity bills and much more! Priyanka Gandhi gave many promises on the backdrop of Uttar Pradesh Assembly elections

    आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘कोरोना महामारीच्या काळात उत्तरप्रदेशमधील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. सध्याच्या सरकारच्या उदासीनतेचा आणि दुर्लक्षपणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश काँग्रेसने असे ठरवले आहे, काँग्रेसचे सरकार येईल तेव्हा कोणत्याही आजारावर मोफत उपचार केले जातील आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे.’


    Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप


    काँग्रेसने गहू आणि धान खरेदी २,५०० रुपये प्रति क्विंटल आणि उसाला ४०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. २० लाख लोकांना नोकऱ्या देण्याव्यतिरिक्त, प्रियंका गांधींनी सांगितले की जर राज्यात काँग्रेस सत्तेवर आले तर त्यांचा पक्ष सर्वांचे वीज बिल अर्ध्यावर आणेल.

    20 lakh jobs, up to 10 lakh free treatment, reduction in electricity bills and much more! Priyanka Gandhi gave many promises on the backdrop of Uttar Pradesh Assembly elections

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’