• Download App
    पाकिस्तानातील मंदिरावरील हल्लाप्रकरणी पोलिसांना आली अखेर जाग, जगभरातून टीकेनंतर २० अटकेत|20 arrested in Pakistan temple attack

    पाकिस्तानातील मंदिरावरील हल्लाप्रकरणी पोलिसांना आली अखेर जाग, जगभरातून टीकेनंतर २० अटकेत

    विशेष प्रतिनिधी

    लाहोर – पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात भोंग येथे गणपती मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर वीस जणांना अटक केली. तसेच दीडशेहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
    याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने जगभरातून टीका होवू लागली होती. तसेच पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने देखील चिंता व्यक्त केली.20 arrested in Pakistan temple attack

    पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजकंटकांवर कारवाई होत नसल्याने पाकिस्तान सरकारला आणि पंजाब पोलिसांना फटकारले होते.लाहोरपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रहीमयार खान जिल्ह्यातील भोंग येथे बुधवारी एका गणेश मंदिरावर समाजकंटकांनी हल्ला केला.



    यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत वीस संशयितांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.

    मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी दीडशेहून अधिक समाजकंटकांवर गुन्हा दाखल केले आहेत. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिराची दुरुस्ती केली जात आहे. पाकिस्तानच्या संसदेने काल एक प्रस्ताव मांडत मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला.

    20 arrested in Pakistan temple attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न