• Download App
    जम्मू-काश्मिरात एलओसीजवळ भूसुरुंग स्फोट, भारताचे 2 जवान शहीद, तीन जखमी । 2 soldiers martyr and 3 injured in landmine blast near loc in jammu and kashmir

    जम्मू-काश्मिरात एलओसीजवळ भूसुरुंग स्फोट, भारताचे 2 जवान शहीद, तीन जखमी

    जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शनिवारी भूसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान शहीद झाले, तर तीन जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत असताना स्फोट झाला आणि त्यात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाला. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. 2 soldiers martyr and 3 injured in landmine blast near loc in jammu and kashmir


    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शनिवारी भूसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान शहीद झाले, तर तीन जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत असताना स्फोट झाला आणि त्यात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाला. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत.

    जम्मू क्षेत्राच्या संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, “नौशेरा सेक्टरमधील परिसरात गस्त घालत असताना माइनचा स्फोट झाला, ज्यामध्ये दोन भारतीय लष्कराचे जवान गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर सैनिकांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



    प्रवक्त्याने सांगितले की, लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर हे अतिशय शूर आणि मेहनती होते, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या दोन्ही शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानासाठी देश आणि भारतीय लष्कर सदैव ऋणी राहील. लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते.

    काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह नऊ जवान शहीद झाले होते. दहशतवादी पुंछच्या जंगलात लपले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नौशेरा सेक्टरमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून लष्कराची कारवाई सुरू आहे. नौशेरा सेक्टर राजौरी जिल्ह्यांतर्गत येतो, जो जम्मूमधील पीर पंजाल प्रदेशाचा भाग आहे. गेल्या 18 वर्षांतील या प्रदेशातील दहशतवादविरोधी ही सर्वात मोठी कारवाई आहे.

    2 soldiers martyr and 3 injured in landmine blast near loc in jammu and kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक