वृत्तसंस्था
पाटणा : 2024च्या लोकसभेसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी पाटणा येथे बैठक होणार आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला आपने काँग्रेससमोर दिल्लीतील अध्यादेशाला पाठिंबा देण्याची अट ठेवली.17 opposition parties will gather in Patna, Sharad Pawar, Thackeray will also reach for Mission 2024
त्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यावर बैठकीचे यजमान जदयूने बैठकीत केवळ 2024 मधील रणनीतीवर चर्चा होईल, असे स्पष्ट केले.
विरोधकांच्या बैठकीत नेतृत्वावर कोणतीही चर्चा होणार नाही. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाटण्यात दाखल झाल्या. त्यांनी राजद प्रमुख लालूप्रसाद यांची भेट घेतली आणि त्यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुक अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन शुक्रवारी पाटणा येथे पोहोचणार आहेत.
ही चहा पार्टी आणि फोटो सेशन, भाजपची टीका
बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले, ही बैठक म्हणजे फोटो सेशन आणि चहापान यापेक्षा जास्त काही नाही. माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी बैठकीचे वर्णन बेडकाला तराजूत तोलणे असे केले आहे. तर बसपा प्रमुख मायावतींनी विरोधी पक्षांचाच समाचार घेतला.
17 opposition parties will gather in Patna, Sharad Pawar, Thackeray will also reach for Mission 2024
महत्वाच्या बातम्या
- मायक्रोन गुजरातमध्ये उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट; 6,700 कोटींच्या गुंतवणुकीने 5,000 नोकऱ्यांची निर्मिती
- ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!
- बंगाल के माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांची कन्या होणार पुरुष, सुचेतना सेक्स चेंज केल्यानंतर सुचेतन बनणार
- ‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू