विशेष प्रतिनिधी
पाटणा : पश्चिम चंपारण येथे गेल्या दोन दिवसात विषारी दारुचे प्राशन केल्याने सुमारे १६ जणांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.16 died in hooch tragidy
पश्चिाम चंपारण जिल्ह्यातील लौरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १६ जणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कालपर्यंत मृतांचा आकडा ८ होता आणि तो १६ वर पोचला आहे. आजारी पडलेल्या नागरिकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
परंतु मृतांचा आकडा वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक काहीच बोलण्यास तयार नाहीत. पोलिस म्हणाले की, याप्रकरणासंदर्भात ग्रामस्थांशी आणि पीडितांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. परंतु विषारी दारुचे पुरावे मिळाले नाही. तपास मात्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
16 died in hooch tragidy
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडिया लोकांचे मारेकरी असल्याचा ज्यो बायडेन यांचा थट आरोप
- भारतासाठी इस्रायली नागरिकांनी केली सांगितीक प्रार्थना
- पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल; गृह राज्यमंत्री देसाईंचे वक्तव्य
- पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी बंडाची तलवार केली म्यान
- दानिश सिद्दिकीच्या मृत्यूत हात नसल्यचा तालिबानचा दावा, खेद व्यक्त करीत उपरती