• Download App
    अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी|14-day judicial custody for Congress leader who placed tricolor on Atiq Ahmed's grave

    अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता अतिक अहमद याला शहीद ठरवून कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रयागराज येथील काँग्रेसचे नगरसेवक राजकुमार ऊर्फ ​​रज्जू भैय्या यांनी अतिक हत्याकांडानंतर त्याच्या कबरीवर तिरंगा ठेवून त्यांना शहीद घोषित केले होते. या घटनेनंतर धुमनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी राजकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.14-day judicial custody for Congress leader who placed tricolor on Atiq Ahmed’s grave

    इतकेच नाही तर अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणीही काँग्रेस उमेदवाराने केली होती. राजकुमारने अतिकच्या कबरीवर तिरंग्याला सलामी दिली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राजकुमार हे आतिकला शहीद दर्जा देणार असल्याचे सांगत होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच पक्षाने त्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.



    ही घटना समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी प्रयागराजच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले. राजकुमारने अतिक आणि अश्रफ यांच्या कबरीवर जाऊन तिरंगा ध्वज ठेवला आणि दोघांनाही अमर म्हटले.

    दरम्यान, 15 एप्रिल रोजी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना घटनास्थळावरून अटक केली. 16 एप्रिल रोजी, अतिक-अश्रफ यांना प्रयागराजच्या कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते.

    14-day judicial custody for Congress leader who placed tricolor on Atiq Ahmed’s grave

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य