• Download App
    ऑपरेशन गंगामध्ये ११ हजार भारतीय युक्रेनमधून परत, खार्किव्हमध्ये एकही भारतीय नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट|11,000 Indians return from Ukraine in Operation Ganga, no Indian in Kharkiv: Foreign Ministry

    ऑपरेशन गंगामध्ये ११ हजार भारतीय युक्रेनमधून परत, खार्किव्हमध्ये एकही भारतीय नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ऑपरेशन गंगामध्ये आत्तापर्यंत ११ हजार भारतीय युक्रेनमधून परत आणण्यात आले आहेत. खार्किवमध्ये आता एकही भारतीय नाही. सर्व भारतीयांना पिसोचिनमधूनही काही तासांत बाहेर काढले जाईल. आता सरकारचे लक्ष सुमीवर आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.11,000 Indians return from Ukraine in Operation Ganga, no Indian in Kharkiv: Foreign Ministry

    परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना परत आणण्यात आले आहे. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थी युद्धग्रस्त भागात अडकले आहेत. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी कीव्हमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना पिसोचिन येथे आणण्यासाठी 3 बसेस आल्या आहेत. लवकरच आणखी 2 बसेस दाखल होतील.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा एकदा युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. गेल्या 4 दिवसांतील पंतप्रधानांची ही 9वी बैठक आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत, पंतप्रधान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सतत अशा बैठका घेत आहेत आणि स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.

    रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यापासून केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत आतापर्यंत 11,000 भारतीयांना सुरक्षित परत आणले आहे. एअर एशियाच्या विमानाने दिल्लीला पोहोचलेल्या 170 नागरिकांचे स्वागत करण्यासाठी आलेले परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. मुरलीधरनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक ट्विट करण्यात आले आहे.

    त्यांनी लिहिले की, ‘युक्रेनमधून आतापर्यंत 11 हजार भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. एअर एशिया इंडियाच्या माध्यमातून 170 भारतीयांच्या गटाला नवी दिल्ली विमानतळावर पाहून आनंद झाला.परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांच्या व्यतिरिक्त भारतीय वायुसेनेने आज ट्विट केले की ‘ऑपरेशन गंगा’चा एक भाग म्हणून गेल्या 24 तासांत पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाकियाच्या एअरफील्डमधून 629 भारतीय नागरिकांसह तीन कअऋ उ-17 विमाने हिंडन एअरबेसवर परतली. तसेच या विमानांनी 16.5 टन मदत सामग्री बाधित देशांत पोहोचवली आहे.

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 630 भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत रोमानिया आणि हंगेरी येथून हिंडन एअरबेसपर्यंत तीन उड्डाणे चालवली. हवाई दलाने सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत रोमानियाची राजधानी बुखारेस्ट, हंगेरीची राजधानी बुडापेस्ट आणि पोलिश शहर रजेसो येथून हिंडन एअरबेसपर्यंत चार उड्डाणे चालवली,

    ज्याद्वारे 798 भारतीयांना परत आणण्यात आले. हवाई दलाने आतापर्यंत एकूण 1,428 भारतीयांना सात उड्डाणांद्वारे युक्रेनमधून परत आणले आहे.केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आतापर्यंत 48 उड्डाणे भारतात पोहोचली आहेत, त्यापैकी 18 उड्डाणे गेल्या 24 तासांत पोहोचली आहेत.

    या 18 फ्लाइट्समधून परतलेल्या भारतीयांची संख्या सुमारे 4000 आहे. भारत युक्रेनच्या पश्चिम शेजारी जसे की रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे बाहेर काढत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे 24 फेब्रुवारीपासून युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद आहे.

    11,000 Indians return from Ukraine in Operation Ganga, no Indian in Kharkiv: Foreign Ministry

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य