• Download App
    पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने सरकारचे वर्षाला १.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान|1.4 lakh crore loss in year due to reduction in taxes on petrol and diesel

    पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने सरकारचे वर्षाला १.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवरील व्हॅट १० रुपयांनी कमी केल्याने केंद्र सरकारचे सुमारे १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. दर महिन्याच्या महसुलात ८,७०० कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. यंदाच्या वर्षी कर संकलनात ४५ हजार कोटी रुपये तर पुढील वर्षी एक लाख कोटी रुपयांची घट होणार आहे. अबकारी कराचे सर्वात कमी संकलन यामुळे होणार आहे.1.4 lakh crore loss in year due to reduction in taxes on petrol and diesel

    गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये क्रुड ऑईलच्या किंमती कमी झाल्यावर सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये १३ रुपये तर डिझेलवरील व्हॅट १६ रुपयांनी वाढविला होता. त्यामुळे पेट्रोलवरील व्हॅट ३२.९८ रुपये तर डिझेलवरील ३१.८३ ुपये झाला होता. पाच रुपये कमी केल्याने पेट्रोलवरील व्हॅट २७.९० रुपये तर डिझेलवरील २१.८० रुपये होणार आहे.



    केंद्र सरकारने व्हॅट कमी केल्यावर गुजरात, कर्नाटक, गोवा, मणिपूर आणि त्रिपुरा या भाजपशासित राज्यांनीही व्हॅय कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. या राज्यांतील किंमती देशातील इतर ठिकाणांपेक्षा सात रुपयांनी कमी आहेत. उत्तर प्रदेशात पेट्रोलवरील व्हॅटमध्ये सात रुपये आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये २ रुपये तर बिहार सरकारने अनुक्रमे १.३० रुपये आणि १.९० रुपयाने व्हॅट कमी केला आहे.

    1.4 lakh crore loss in year due to reduction in taxes on petrol and diesel

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य