प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य असतं आणि आपल्या काही आवडीनिवडी त्याच्याशी जोडलेल्या असतात. पण उन्हाळा हा एक असा ऋतू आहे जो एका कारणासाठी जवळपास प्रत्येक व्यक्तीलाच आवडत असावा. हे कारण म्हणजे फळांचा राजा आंबा. उन्हाळ्यामध्ये आंबा बाजारात येतो. आंबा आवडणार नाही असा व्यक्ती क्वचितच सापडतो. त्यामुळं आंब्यासाठी लहान-मोठे सर्वच उन्हाळ्याची आवर्जुन वाट पाहत असतात. आता आंबा म्हटलं तर त्याचेही अनेक प्रकार भौगोलिक परिस्थितीनुसार पाहायला मिळतात. पण जगभरात आंब्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो कोकणचा हापूस (Alphonso Mango) आंबा. बाजारात आपल्याला अनेक ठिकाणी हापूस आंबा विकत मिळत असतो. पण तो खरंच कोकणातला हापूस असतो का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण अनेकदा स्थानिक परिसरात पिकणारा हापूस आंबादेखिल कोकण हापूस म्हणून विकला जातो. अनेक ग्राहक त्याची खरेदी करतात. पण चव सर्वकाही सांगून जाते. मात्र खाण्याच्या आधीच अस्सल हापूस कसा ओळखायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
हेही पाहा –