• Download App
    ENTERTAINMENT! यशराज फिल्मसचा लसीकरणासाठी पुढाकार; बॉलिवूडमधील सदस्यांना पुरवणार लस। Yashraj Films' initiative for vaccination; Vaccines to be provided to members in Bollywood

    ENTERTAINMENT! यशराज फिल्मसचा लसीकरणासाठी पुढाकार; बॉलिवूडमधील सदस्यांना पुरवणार लस

    बॉलीवुड लसीकरण मोहिमेसाठी आदित्य चोप्रा यांनी पुढाकार घेतला .


    भव्य वायआरएफ स्टुडिओजमध्ये होणार लसीकरण .


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूडमधील सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी यश राज फिल्म्स या भारतातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन हाऊसने महत्वाची जवाबदारी उचलली आहे .हिंदी चित्रपटसृष्टीतील सदस्यांना लस पुरवणार असल्याची माहिती समोर आली आहे . Yashraj Films’ initiative for vaccination; Vaccines to be provided to members in Bollywood

    या लसीकरण मोहिमेची सुरुवात आदित्य चोप्रा यांनी केली आहे . त्यामुळे या क्षेत्रात कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे . कोरोनाच्या प्रसारामुळे मागील वर्षापासून चित्रपट सृष्टितील काम बंद आहे.



    या लसीकरण मोहिमेसाठी आदित्य चोप्रा यांनी आपल्या भव्य वायआरएफ स्टुडिओजचे दरवाजे खुले केले आहेत. पहिल्या टप्प्यात किमान 4000 कामगारांना इथे लस देण्यात येणार आहे.

    FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज)च्या 30,000 नोंदणीकृत सदस्यांना लस देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे वायआरएफने ठरवले आहे. मुंबईत वायआरएफच्या स्टुडिओत घेतलेल्या या आधीच्या टप्प्यात कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस दिली होती.

    “वायआरएफच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर आमच्या सिनेमातील क्रू मेंबर्ससाठी आम्ही लसीकरण सुरू केले आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीसाठी लसीकरण मोहीम सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यामुळे आमच्या या क्षेत्रातील रोजंदारीवरील कामगारांना पुन्हा काम सुरू करता येईल आणि त्यांना, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभू शकेल.

    ही मोहीम टप्प्या-टप्प्यांमध्ये पार पडेल. आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आम्ही साधारण 3500-4000 लोकांना लस देऊ शकू. या जागतिक महासंकटाचा प्रचंड परिणाम झालेल्या या क्षेत्राला पुन्हा सुरू करण्यात साह्य करण्यास वायआरएफ बांधिल आहे.” असे यश राज फिल्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी म्हणाले.

    Yashraj Films’ initiative for vaccination; Vaccines to be provided to members in Bollywood

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!