• Download App
    Mumbai Rain : धो-धो पावसाने मुंबईत पुन्हा पाणी-पाणी, हायटाइडचा इशारा, रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेवरही परिणाम । Monsoon in Mumbai, Severe waterlogging at Kings Circle and Railway tracks submerged Watch Video

    Monsoon in Mumbai : धो-धो पावसाने मुंबईत पुन्हा पाणी-पाणी, हायटाइडचा इशारा, रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेवरही परिणाम

    Monsoon in Mumbai : मुंबईत वेळेआधीच मान्सूनने धडक दिली आहे. मान्सूनच्या आगमनासह मुंबईसाठी धोक्याची घंटाही वाजली आहे. आज म्हणजेच बुधवारी मुंबईत हायटाइडचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शहराच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच समुद्रात हायटाइडचाही अंदाज आहे. यादरम्यान समुद्राच्या लाटा 4.16 मीटर उंच उठू शकतात. खबरदारी म्हणून समुद्राच्या किनारी भागाला खाली करून घेण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर अनेक पथकांद्वारे निगराणी केली जात आहे. Monsoon in Mumbai, Severe waterlogging at Kings Circle and Railway tracks submerged Watch Video


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत वेळेआधीच मान्सूनने धडक दिली आहे. मान्सूनच्या आगमनासह मुंबईसाठी धोक्याची घंटाही वाजली आहे. आज म्हणजेच बुधवारी मुंबईत हायटाइडचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शहराच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच समुद्रात हायटाइडचाही अंदाज आहे. यादरम्यान समुद्राच्या लाटा 4.16 मीटर उंच उठू शकतात. खबरदारी म्हणून समुद्राच्या किनारी भागाला खाली करून घेण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर अनेक पथकांद्वारे निगराणी केली जात आहे.

    अनेक भागांत रस्ते जलमय

    आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार म्हणाले की, मान्सून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची तारीख 10 जून होती, पण यावेळी मान्सून वेळेच्या एक दिवस अगोदर दाखल झाला आहे. यापूर्वी मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत पाणी साचले. अनेक भागांत रस्ते पाण्यात बुडून गेले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती. मुंबईतील हिंदमाता येथील रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले.

    मुंबईतील रेल्वे रुळही पाण्यात बुडून गेले आहेत, त्यामुळे लोकल ट्रेन सेवेवरही परिणाम झाला आहे.

    हेल्पलाइन नंबर जारी

    एमएमआरडीएने पाऊस व त्यापासून होणाऱ्या समस्यांपासून बचावासाठी 24 तासांचा आपात्कालीन मान्सून कंट्रोल रूम सुरू केला आहे. एमएमआरडीएने (मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) मुंबईत 24 तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. याअंतर्गत अडचणीतील कोणतीही व्यक्ती मोबाइल नंबर 8657402090 आणि लँडलाइन क्रमांकावर 02226594176 वर कॉल करून मदतीसाठी विनंती करू शकते.

    ठाण्यात तलाव व धरणाजवळ जाण्यास बंदी

    महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा प्रशासनाने या भागात पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर धबधबे, तलाव व धरणांजवळ लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परिसरातील जलसंचयांवर होणारे अपघात रोखण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशात जिल्ह्यातील काही धोकादायक ठिकाणांची यादी देण्यात आली असून लोकांना पावसाळ्यात या ठिकाणी न जाण्यास सांगितले आहे.

    हा आदेश सीआरपीसीच्या कलम 144, महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जारी करण्यात आला आहे. ठाणे तालुक्यात येयूर, कळवा, मुंब्रा, रेतीबंदर, गायमुख आणि उत्तर किनारपट्टी येथे लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    Monsoon in Mumbai, Severe waterlogging at Kings Circle and Railway tracks submerged Watch Video

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    संदेशखळीत CBIची मोठी कारवाई, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त!

    काँग्रेस सीईसीची आज दिल्लीत बैठक; उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीसह उर्वरित जागांवर उमेदवार ठरवणार

    काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसणार?