• Download App
    तीन महिने शिल्लक तरी एक रुपया खर्च नाही आणि आले मोठे अकलेचे धडे शिकविणारे, नारायण राणे यांचा अजित पवारांवर पलटवार|With three months left, not a single rupee has been spent, who teaches the lessons of great wisdom, Narayan Rane retaliates against Ajit Pawar

    तीन महिने शिल्लक तरी एक रुपया खर्च नाही आणि आले मोठे अकलेचे धडे शिकविणारे, नारायण राणे यांचा अजित पवारांवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी

    कणकवली : कोकणात मंजूर निधी आर्थिक वर्ष संपायला ३ महिने शिल्लक आहे तरी १ रुपया खर्च नाही. हा यांचा कारभार आणि आले मोठे अकलेचे धडे शिकवणारे असा पलटवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.With three months left, not a single rupee has been spent, who teaches the lessons of great wisdom, Narayan Rane retaliates against Ajit Pawar

    अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचार सभेत नारायण राणे यांचं नाव न घेत अप्रत्यक्षपणे थेट अक्कल काढली. त्यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, मी अजित पवार यांना १०० कोटी रुपये तरी देऊन जा म्हणालो. लघपाटबंधारेचे टेंडर काढले नाही, १३ कोटी यायला पाहिजे होते,



    तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही. वर्ष संपायला ३ महिने आहेत तरी १ रुपयाही खर्च नाही. हा यांचा कारभार आहे. त्यांना मी रस्त्यांची काय स्थिती आहे ते बघून जा म्हणून सांगितलं. विमानतळापासून सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

    अजित पवार म्हणाले, सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निधार्राने मतदान करा.

    कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.

    पवार म्हणाले, खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड आहे. कारण पार्टी तिथं कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथं मजबुतीने काम करत असेल तर आमदारकी-खासदारकीत जमून जातं.

    इथं मात्र, वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. आज आपल्या राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर याच बँका चांगल्या आहेत.

    With three months left, not a single rupee has been spent, who teaches the lessons of great wisdom, Narayan Rane retaliates against Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस