• Download App
    शिवसेना कुणाची? आज पुन्हा युक्तिवाद - प्रतियुक्तिवा; निर्णय शुक्रवारी शक्य|Whose Shiv Sena? Arguments again today counterargument Decision possible on Friday

    शिवसेना कुणाची? आज पुन्हा युक्तिवाद – प्रतियुक्तिवा; निर्णय शुक्रवारी शक्य

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली :शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे, यावर मंगळवार, १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. दोन्ही गटांनी युक्तिवाद प्रतियुक्तिवाद केले. त्यावेळी ठाकरे गटाच्या बाजूने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. मात्र त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही, पुढील सुनावणी शुक्रवारी, २० जानेवारी रोजी पुढे ढकलण्यात आली आहे.Whose Shiv Sena? Arguments again today counterargument Decision possible on Friday

    काय म्हणाले वकील सिब्बल?

    आजच्या सुनावणीच्या वेळी वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची जी घटना आहे, तीच खरी आहे. शिंदे गटाने जे प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, त्यावर ओळख परेड करण्यात यावी, अशी मागणी केली. आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नव्हे, शिंदे गट शिवसेनेचीच घटना मान्य करतात आणि त्यात तोडफोडही करून त्यात बदल करून ती घटना नाही, असाही युक्तिवाद करतात, हे अमान्य आहे, असेही कपिल सिब्बल म्हणाले.



    अपात्रतेच्या निकालाच्या आधी हा निकाल नको

    जोवर सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेच्या मुद्यावरील याचिका निकाली निघत नाही तोवर यावर निर्णय घेऊ नये, असेही सिब्बल म्हणाले. शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्य नेता हे पदच नाही, पक्षात इतर सभासदांची निवडणूक होते, हा पक्ष घटनेनुसार चालतो, हे आयोगाला सांगितले आहे. मात्र यावर ठाकरे गटाला अजून २ तास युक्तिवाद करायचा आहे, असेही वकील सिब्बल म्हणाले.

    Whose Shiv Sena? Arguments again today counterargument Decision possible on Friday

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस