• Download App
    स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रामध्ये होणार चित्रीकरण। Who will play the role of Swatantryaveer Savarkar? Filming will take place in London, Andaman and Maharashtra

    स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रामध्ये होणार चित्रीकरण

    वृत्तसंस्था

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटात सावरकर यांची भूमिका कोण साकारणार, या विषयी मोठी उत्सुकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये होणार आहे. Who will play the role of Swatantryaveer Savarkar? Filming will take place in London, Andaman and Maharashtra

    बॉलिवूडचे निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केली आहे. संदीप यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजकेर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पण या चित्रपटात कोणता अभिनेता स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही अभिनेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.



    ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील सावरकरांच्या भूमिकेसाठी अभिनेता आयुषमान खुराना, रणदीप हुड्डा आणि राजकुमार राव या कलाकारांच्या नावाची चर्चा आहे. ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी रणदीपने १८ किलो वजन किमी केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. तसेच आयुषमान आणि राजकुमार यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे आता निर्माते कोणत्या अभिनेत्याची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Who will play the role of Swatantryaveer Savarkar? Filming will take place in London, Andaman and Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!