• Download App
    महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावताना अर्थचक्रास कमीत कमी धक्का; कोरोनामुळे आजारी कामगाराला नोकरीवरून काढता नाही येणार!! While corona prevention measures in Maharashtra, the state government will have to push the economic cycle to a minimum

    महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावताना अर्थचक्रास कमीत कमी धक्का; कोरोनामुळे आजारी कामगाराला नोकरीवरून काढता नाही येणार!!

    वृत्तसंस्था

    मुंबई – महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना राज्य सरकारने अर्थचक्रास कमीत कमी धक्का लागेल, याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच बरोबर केवळ कामगाराला कोरोना झाला म्हणून नोकरीवरून कमी करता येणार नाही. त्याची कंत्राटदाराने तपासणी करून घ्यावी, असेही सरकारने स्पष्ट केल्याने कामगार वर्गाला दिलासा मिळाला आहे. While corona prevention measures in Maharashtra, the state government will have to push the economic cycle to a minimum

    जमावबंदी आणि संचारबंदीसारखे कठोर निर्बंध लावताना राज्याचे अर्थचक्र थांबणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे होते. त्यामुळे फक्त लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीतपणे पण कठोर नियमावलीसहित सुरू राहील याची दखल घेण्यात आली आहे.

    खासगी कार्यालयेउपाहारगृहेचित्रपटगृहेगर्दीची ठिकाणी बंद राहतील. यापुढे या सरकारी आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार आहे.

     शेती व शेतीविषयक कामेअन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील. राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.



     

    बागाचौपाट्यासमुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

    किराणाऔषधीभाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकानेमॉल्सबाजारपेठा३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.

    उद्योग आणि उत्पादन क्षेत्र सुरूच राहीलमात्र तेथे आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची हमी व्यवस्थापनाने घ्यावी. कोणतेही चित्रीकरण सुरू ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

    आजारी कामगाराला काढता येणार नाही

    बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी  कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. परंतु अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही कामगाराला कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.

    वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे. शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

    ५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार बाहेरच्या लोकांवर प्रवेशबंदी करण्यात येईल.


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस