• Download App
    ''जिथे 'जात' शब्द आला, तिथं शरद पवार अ‍ॅक्टिव्ह होतात, आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा...'' भाजपाने लगावला टोला! Wherever the word caste comes Sharad Pawar becomes active even today the glasses of casteism are on his eyes Criticism of BJP

    ”जिथे ‘जात’ शब्द आला, तिथं शरद पवार अ‍ॅक्टिव्ह होतात, आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा…” भाजपाने लगावला टोला!

    शेतकऱ्यांना तुम्ही काही दिलं नाही, आम्ही देतोय तर तुम्हाला त्रास का होतोय? असा सवालही केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीच्या आधी त्यांची जात विचारल्या जात असल्याचा प्रकार सांगलीत समोर आला आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा मुद्दा आज विधानसभेतही चर्चेत आला आणि सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून जुंपल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यावर भाजपाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. Wherever the word caste comes Sharad Pawar becomes active even today the glasses of casteism are on his eyes Criticism of BJP

    सांगलीतील घटनेवर बोलताना, “शेतकऱ्यांना अशाप्रकारे जात विचारणं हे चुकीचं आहे. आजपर्यंत देशाच्या किंवा राज्याच्या इतिहास असा प्रकार घडला नव्हता. जर शेतकऱ्यांना जात विचारली जात असेल तर याचे कारण काय? हे पुढे आलं पाहिजे. यासंदर्भात माहिती आम्ही घेतो आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांना दिली.


    Manish Sisodia : मनीष सिसोदियांना न्यायालयाकडून डबल झटका! १७ मार्चपर्यंत सुनावली ‘ईडी’ कोठीडी


    यावर भाजपाने ‘’जिथे ‘जात’ शब्द आला, तिथं शरद पवार अ‍ॅक्टिव्ह होतात. पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावले. आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा तसाच आहे. म्हणूनच कृषिमंत्रालयाच्या संकेतस्थळावर ‘प्रवर्ग’ विचारण्यात आला असता शरद पवारांना त्यात ‘जात’ दिसली.’’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.

    याशिवाय, ‘’शरद पवार तुम्ही कृषिमंत्री असताना खतांवर सबसिडी मिळत नव्हती. आता सबसिडी मिळत आहे त्याचा तुम्हाला त्रास होतय. शेतकऱ्यांना तुम्ही काही दिलं नाही, आम्ही देतोय तर तुम्हाला त्रास का होतोय? तुमचा स्वभाव, गुण जातीपातीच राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा आहे.’’ अशी टीकाही भाजपाने केली आहे.

    सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर, त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा त्याची जात कोणती, तो कोणत्या जातीचा आहे हे सांगावं लागतं. तशी नोंद पॉस मशिनमध्ये केली जाते. ही संतापजनक गोष्ट आहे, शेतकऱ्यांना जात नसते. तुमच्या-माझ्या पोटाला जात नसते. तर खत खरेदी करताना जात सांगण्याची गरज काय ? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला.

    Wherever the word caste comes Sharad Pawar becomes active even today the glasses of casteism are on his eyes Criticism of BJP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!