विशेष प्रतिनिधी
नांदेड : आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भोकर फाटा सत्य गणपती येथे साकडे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रामध्ये अत्याचार कधी कमी होणार व महाविकास आघाडी सरकारला कधी सुबुद्धी येणार ? असा सवाल महिलांनी केला.When will wisdom come toThackeray – Pawar government
प्रत्येक एका तासाला महाराष्ट्रामध्ये अत्याचार होत आहे. साकीनाकाची घटना असो व महाराष्ट्रातील इतर घटना देखील नराधमांना फाशी देण्याऐवजी हे महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने आघाडी सरकारला सुबुद्धी देवो, यासाठी सत्य गणपती मंदिर येथे साकड आंदोलन करत असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकार हे भक्तांसाठी नसून ते फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागले आहे. त्यांना लोकांच्या धार्मिक भावनेचा विचार देखील नाही. मंदिर उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने खूप आंदोलन करून मंदिरे उघडलेली नाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टी महिला राज्य उपाध्यक्ष प्रणिता देवरे पाटील चिखलीकर यांनी सरकारवर केला आहे.
- ठाकरे – पवार सरकारला सुबुद्धी कधी येणार ?
- नांदेडला मोर्चात महिलांचा आक्रोश
- भाजप महिला मोर्चाचे गणरायाला साकडे
- महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना वाढल्याने संताप
- दर तासाला अत्याचाराची एक घटना दुर्दैवी
- महाविकास आघाडी सरकार पैशाच्या मागे
- मंदिरे त्वरित खुली करण्याची आग्रही मागणी