विशेष प्रतिनिधी
पुणे : एस्टी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले असा सवाल त्यांनी केला आहे.When did Sharad Pawar start playing the role of government? Question by Chadrakant Patil
महागाई भत्त्यात वाढ आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नसून, संप चिघळला आहे.
शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना म्हणाले “एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे.
८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना १७ महिन्यांचे पगार मिळालेले नाहीत ते आधी द्या. कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये बोनस दिला आहे. घरातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण पाच हजार रुपये देतो. २९ आत्महत्या झाल्या आहेत.
कोविडमध्ये एसटी नसती तर महाराष्ट्राला अर्धांगवायू झाला असता. अशा एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा नियम असताना पाच लाख द्यायचे. आतापर्यंत झालेल्या आत्महत्या वाढवायच्या आहेत का? एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी भाजपा ताकदीने त्यांच्या मागे उभी आहे.
When did Sharad Pawar start playing the role of government? Question by Chadrakant Patil
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न