प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे. येत्या 5 – 6 महिन्यात सरकार पडेल आणि महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, शरद पवार जे बोलतात त्याच्या नेमके नेहमी उलट होत असते, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. What Sharad Pawar says is exactly the opposite !!; Reply by Praveen Darekar
भले शरद पवार 6 महिने सरकार चालेल, असे म्हणाले असतील. पण ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलट होत असते. त्यामुळे आगामी अनेक दशके भाजपची सत्ता महाराष्ट्रात राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
आज विधानसभेत भाजप-शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या चाचणीनंतर शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार आहे, पण बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी शरद पवारांनी मोठे विधान करुन भाजप-शिंदे सरकार सहा महिन्यात पडेल असे म्हटले होते. त्यावर भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
दरेकर म्हणाले, मविआ राज्यातील जनतेला समाधान देऊ शकले नाही. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्याला अपेक्षा आहेत. हे सरकार उत्तम चालू शकते, आमदारांचेही समाधान होईल. कुणाकडेही बोट दाखवण्याची गरज नाही, असा टोला दरेकरांनी लगावला.
अमरावतीचे प्रकरण गंभीर
दरेकर यांनी अमरावती प्रकरणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, अमरावतीत उमेश कोल्हे यांची झालेली हत्या गंभीर बाब आहे. त्या प्रकरणाची सर्व चौकशी होणार आहे. आता सरकार बदलले आहे पण पोलिसांनी दडपशाही करून चूक नसलेल्या लोकांना नोटीसा दिल्या असेल तर असे प्रकार त्यांनी करु नये असेही ते म्हणाले.
What Sharad Pawar says is exactly the opposite !!; Reply by Praveen Darekar
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज विधानसभेत अग्निपरीक्षा, नव्या सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार
- शिवसेना गट नेतेपदाच्या शिक्कामोर्तबासह शिंदे सरकार आज जाणार शक्तिपरीक्षेला सामोरे!!
- शरद पवार म्हणतात : मध्यावधी निवडणुकांना तयार राहा;… पण राष्ट्रवादीला त्या हव्यातच का??
- भाजपची आक्रमक खेळी : शिवसेना, समाजवादी, टीआरएस 3 प्रादेशिक पक्षांवर ओढवली कंबख्ती!!