Weather Alert : महाराष्ट्राच्या विविध भागांत पुढील दोन ते तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्यामुळे तापमानातही घट होणार आहे. उत्तरेकडे सरकणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे 10 ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात हलका पाऊस अपेक्षित आहे. Weather Alert IMD warns of hail and thunderstorm in many parts of Maharashtra
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांत पुढील दोन ते तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्यामुळे तापमानातही घट होणार आहे. उत्तरेकडे सरकणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे 10 ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात हलका पाऊस अपेक्षित आहे.
10 जानेवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल. तसेच गारा पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यभरात हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्यानुसार पुढील तीन-चार दिवस असेच राहणार आहेत. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे.
विदर्भासाठी अलर्ट जारी
महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथील हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या भागात हलका पाऊस अपेक्षित आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील या भागात पुढील दोन-तीन दिवस पाऊस पडल्यानंतर तापमानात झपाट्याने घट होऊन थंडी वाढेल. मराठवाड्यातही अनेक भागांत हवामानाचा कल असाच राहील. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पिके सडल्याने शहरांतील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरांमध्ये कांदा आणि भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत.
दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवामानही झपाट्याने बदलत आहे. शनिवारी येथे अवकाळी पाऊस झाला. रविवारी आकाश निरभ्र झाले. रविवारी दुपारी वातावरण दमट होते. सोमवारी तापमानात अचानक घट झाली. सोमवारी मुंबईत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.
Weather Alert IMD warns of hail and thunderstorm in many parts of Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात मेट्रोच्या खांबावर लावले नगरसेवकाच्या वाढदिवसाचे फ्लेक्स , नागरिकांनी व्यक्त केला संताप
- सोलापूर महामार्गावर पोलिसांनी पकडला गुटख्याने भरलेला एक आयशर कंटेनर ,४६ लाखांचा गुटखा आणि ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
- उत्तर प्रदेशात सध्या प्रचार सभांचा धडाका नसला तरी…; अखिलेश यांनी तक्रार केली तरी… कोणी काय केले, ते वाचा…!!
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुताई सपकाळ यांची ‘ ती ‘ इच्छा करणार पूर्ण
- न्यूयॉर्कमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, ९ मुलांसह १९ जणांचा मृत्यू, वाचा सविस्तर..