वृत्तसंस्था
मुंबई : आम्ही मातोश्रीवर जाणारच, असे आव्हान राणा दाम्पत्याचे शिवसेनेला आजा पुन्हा दिले आहे. दुसरीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसेनेने मुंबईत फिल्डिंग लावली आहे. एकीकडे मातोश्रीच्या रक्षणासाठी शिवसैनिक काल रात्रीपासूनच या परिसरात ठाण मांडून बसले आहेत. तर राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला आहे. We will go to Matoshri, Rana couple’s challenge to Shiv Sena: Shiv Sainiks stand outside Rana’s house
सध्या राणा यांच्या घराबाहेर शेकडो शिवसैनिक जमा झाले आहेत. काल पत्रकार परिषदेत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या घराबाहेर असणारी शिवसैनिकांची गर्दी पाहता ते मुळात घराबाहेर पडणारच कसे, हा मोठा प्रश्नच आहे. पोलिसांनी त्यांना सुरक्षेसाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य कोणता नवा डाव टाकणार का? हे आज पाहावे लागणार आहे.
राणांनी घरात हनुमान चालिसा पठण करावे, त्यांनी नाटक करू नये, दुसऱ्याच्या घरासमोर ड्रामा कशाला? पोलिसांना कारवाई करण्याची योग्य सुचना असून, कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, वरिष्ठ पोलिस अधिकारी माझ्या संपर्कात आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पोलिस शिवसेनेच्या दबाबाखाली काम करत आहे, आम्हाला अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आम्ही जाणारच – रवि राणा यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे सत्तेचा गैरवापर करत असून, आम्ही मातोश्रीवर जाणारच उद्धव ठाकरेंच्या गुंडागिरीचे दर्शन संपुर्ण महाराष्ट्राला झाले, असे रवि राणा म्हणाले.
नाटक बंद करा- वरुण सरदेसाई
नाटक बंद करा,२३ तारीख आली, सकाळचे नऊ वाजले, शिवसैनिकांच्या संयमाची परिक्षा त्यांनी घेऊ नये, शिवसैनिक राणांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. असे वरुण सरदेसाई म्हणाले. राणा दाम्पत्याने खारमधील घरी पूजा अर्चा केली असून, आम्हाला येथे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, मात्र आम्ही मातोश्रीवर जाणारच, असे राणा दाम्पत्याने म्हटले आहे.
शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले
शिवसैनिक पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून रवी राणांच्या इमारतीत घुसले होते, मात्र पोलिसांनी त्यांना वेळेवर रोखण्याचा प्रयत्न केला. राणा दाम्पत्याला घरातून बाहेर येण्याचे खुले आव्हान शिवसेनेकडून देण्यात येत आहे.
आव्हान देणाऱ्यांना उत्तर – खासदार अनिल देसाई
राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज आहेत, त्यांनी दिल्लीत जाऊन हनुमान चालिसाचे पठण करावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. मातोश्री हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असून, आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, नवहिंदूनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. आम्हाला हनुमान चालिसाचे आव्हान देऊ नका, दिल्लीत जाऊन हनुमान चालिसा वाचा, असे म्हणत खासदार अनिल देसाई यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
We will go to Matoshri, Rana couple’s challenge to Shiv Sena: Shiv Sainiks stand outside Rana’s house
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांचा आवाज चोरीच्या उर्जेवर
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!